वर्धा (प्रशांत अवचट / राहुल मून ) : -वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीने सावंगी (मेघे) येथील महाविद्यालयातील प्राचार्यांच्या जाचाला कंटाळून तीसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली ही धक्कादायक घटना आज (१ आगस्ट) रोजी दुपारच्या सुमारास घडली. पूजा रजनी (वय २२) असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे .
मृतक विद्यार्थीनी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असून महाविद्यालय प्रशासन परिक्षेला बसू देणार की नाही या भीतीपोटी तीने आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे.
सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये नागपूर येथील पूजा रजनी (वय २२) ही विद्यार्थीनी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होती. नियमानुसार परिक्षेला बसण्यासाठी ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. परंतु कॉलेजच्या नियमानुसार तीची हजेरी कमी होती. त्यामुळे प्राचार्यांनी तीला परिक्षेला बसू देणार नाही, अशी तंबी दिली. तीने परिक्षेला बसू देण्यासाठी प्राचार्यांना विनंती देखील केली. परंतु त्यांनी तीचं काही एक ऐकून घेतले नाही. शेवटी हताश झालेल्या त्या विद्यार्थीनीने प्राचार्यांच्या कार्यालया समोरील तीसऱ्या माळ्याच्या गॅलर खाली उडी घेत आत्महत्या केली. यात तीचा मृत्यू झाला.