त्या’ व्यापाऱ्याचा सातव्या दिवशी लागला पत्ता;पोलीसांच्या शोध मोहिमेला लागला विराम !
कोरची/ गडचिरोली :- आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेले येथील व्यापारी मुकेश निनावे ३९ वर्ष यांचा सहा दिवसानंतर २८ जुलैला सकाळी दहा वाजता पत्ता लागला. शुक्रवार दिनांक २२ जुलै रोजी ते अचानक घरून निघून गेले होते. यादरम्यान देसाईगंज जवळच्या वैनगंगा नदीच्या पुलावर त्यांचे कपडे आणि त्यांचे सर्व साहित्य आढळले, ते पोलिसांनी जप्त केले होते. मुकेश निनावेच पत्ता लागल्याने मात्र पोलिसांच्या शोध मोहिमेला आता विराम लागला आहे.
मागील सहा दिवसांपासून बेपत्ता असलेले मुकेश निनावे हे नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील मावस बहिणीच्या गावी सुखरूप असल्याची माहिती पत्नी तृप्ती निनावे यांना फोनवरून मिळाली. व याबाबत तृप्ती यांनी कोरची पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानंतर ताबडतोब चारचाकी वाहन भाड्याने करून कोरची वरून भिवापूरला जाऊन गुरुवारी सायंकाळी मुकेश निनावे ला कोरचीला आणण्यात आले आहे.
त्यानंतर मुकेशला कोरची पोलिस ठाण्यात आणले, पोलिसांच्या तपासामध्ये उघडकीस झाले की कुटुंबातील मानसिक तणावातून त्यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्यासाठी बेपत्ता झाला असल्याचे सांगीतले आहे.