मोटारसायकल अपघातात पोलीस पाटील ठार
कोरची/ गडचिरोली :- कोरची तालुक्यातील सोहले गावातील पोलीस पाटलाचा शुक्रवारी दुपारी ३ वाजता दरम्यान बोटेकसा नाल्याच्या रस्त्यावर मोटारसायकलनी अपघात घडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मृतक पोलीस पाटील जुमेन काटेंगे वय ३६ वर्ष असे असून हे सोहले गावचे पोलीस पाटील होते. बेतकाठीकडून बोटेकसा मार्गानी स्वगावी सोहलेला एकटेच परत येत होते तेव्हा बोटेकसा नाल्याच्या उतारावर दुचाकी क्रमांक सी जी ०८ यू ४६०४ या दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे. मृतकाला एक पत्नी लहान भाऊ असून खूप मोठा काटेंगे परिवार आहे.
सदर मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी याबाबद कोरची पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांना माहिती दिली त्यानंतर गावकऱ्यांच्या व परिवाराच्या मदतीने मृतकाला कोरची ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले आहे. याबद्दल कोरची पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास कोरची पोलीस करीत आहेत.