• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

पत्नीला पळविल्याचा राग ; प्रियकराच्या वडीलाचा केला घातपात ?

अखेर त्या मृतकाची ओळख पटली

Ashish Ghume by Ashish Ghume
July 24, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
पत्नीला पळविल्याचा राग ; प्रियकराच्या वडीलाचा केला घातपात ?
Spread the Information

वरोरा :- कुचना गावालगत असलेल्या कोराडी नालाच्या पुलाखाली एका अज्ञात व्यक्तीचे प्रेत आढळून आले होते . हि माहिती कळताच माजरी पोलिसांना कळतच घटनास्थळी दाखल झाले होते. मृतक अज्ञात असल्याने पोलिसांनी शोध कार्य सुरु केले असता आज त्या अज्ञात मृतकाचे ओळख पटली असून मृतक माजरी येथील रामभाऊ ज्ञानेश्वर पाटील, वय 50 वर्ष, असून सदर इसमाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतकाच्या मुलाने आरोपीच्या पत्नीला पळवून नेले असल्याचा राग मनात ठेवून आरोपीने सदर मृतकाची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे . .
अंदाजे 50 वर्ष वयाचा पुरुष उबडया स्थितीत कोराडी नाल्याचे पुलाखाली मरुन पडलेला असल्याचे आढळुन आले होते . त्यानुसार घटनास्थळाची व प्रेताची पचासमक्ष पोलिसांनी पाहणी केली यावेळी मृतक अनोळखी पुरुष, वय 50 वर्ष, ज्याचे डोक्याचे उजवे बाजुला जबर मारहाण केल्याच्या जखमा आढळुन आल्या. त्यानुसार नमुद अनोळखी मृतकाचा खुन झाला असल्याबाबत दाट संशय पोलिसांना आला होता. त्यामुळे घटनास्थळाचा पंचनामा करुन पोस्टे माजरी येथील पोहवा हरिदास चोपने, यांनी शासनातर्फे दिलेले तक्रारीवरुन पो.स्टे. माजरी येथे कलम 302 भादवी प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती .
सदर गुन्ह्याचे अनुषंगाने अरविंद साळवे (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी तसेच पोलीस स्टेशन माजरी येथे भेट देउन गुन्ह्याचे तपासाबाबत निर्देश दिले या वरून उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी, भा.पो.से. यांचे नेतृत्वात तपासाकरीता पोलीस स्टेशन माजरी, स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वरोरा, सायबर सेल चंद्रपुर येथील पोलीस स्टॉफ ची वेगवेगळी तपास पथक गठीत करण्यात आली होती.
अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु असतानाच सिकंदर रामभाऊ पाटील, रा. माजरी कॉलरी याने पोलिसांनी प्रसिध्द केलेल्या शोध पत्रिकेनुसार मृतकाचे प्रेत पाहुन ओळखले व सदर गुन्ह्यातील मृतक त्याचे वडील रामभाऊ ज्ञानेश्वर पाटील, वय 50 वर्ष, रा. आंबेडकर वार्ड माजरी कॉलरी हेच असल्याचे स्पष्ट सांगीतले. त्यावरुन नमुद मृतकाची ओळख पटली असून त्यानंतर सदर गुन्ह्याचे पुढील तपासा दरम्यान मृतकाचा मुलगा सिंकदर रामभाऊ पाटील रा. गाजरी कॉलरी यास विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, माजरी कॉलरी येथील पिंटु पेटकर याचे पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशयातून पिंटु पेटकर हा नेहमी आमचे सोबत वादविवाद करत होता, मला व माझ्या कुटुंबाला मारण्याची धमकी देत होता. अशी महती मृतकाच्या मुलाने सांगताच लागलीच आशिष उर्फ पिंटु प्रदीप पेटकर, वय 32 वर्ष, रा. आंबेडकर वार्ड माजरी काँलरी यास ताब्यात घेतले. त्यास सदर गुन्ह्यासबंधाने बारकाईने विचारपुस केली असता त्याने मृतकाचा मोठा मुलगा सिकंदर रामभाऊ पाटील यांने माझ्या पत्नीसोबत प्रेमसंबंध प्रस्तापित करुन पळवून नेले व तो भद्रावती येथे माझ्या पत्नीसह राहत आहे. त्यामुळे त्याचा राग मनात धरुन मी सिंकदरच्या वडीलाला दोन साथीदारांचे सोबत मिळुन महाविर स्कुलमध्ये पूर पिडीत लोकांच्या कॅम्प मधुन चारचाकी गाडीमध्ये मध्ये जबरदस्तीने बसवुन कोराडी नाल्याचे पुलीया जवळ नेवून हत्याराने डोक्यावर मारले व पुलाच्या खाली टाकुन दिले.
मृतकाचा मोठा मुलगा सिकंदर रामभाऊ पाटील याने आरोपी आशिष उर्फ पिंटु प्रदीप पेटकर, वय 32 वर्ष, रा. आंबेडकर वार्ड माजरी कॉलरी याच्या बायकोला पळवुन नेले. मुलाचा बदला घेण्याकरीता त्यांनी कट रचुन वडीलास जिवानिशी ठार मारले व वडीलाचे मयतीला जेव्हा आरोपीचे पत्नीला पळवून नेणारा सिकंदर रामभाऊ पाटील हा घरी येईल, त्यावेळी त्याला सुध्दा ठार मारणार असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.

RelatedPosts

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात तपास अधिकारी आयुष नोपानी, सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सा. वरोरा, बाळासाहेब खाडे, स्थानिक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा चंद्रपुर, पोनि पाटील, वाहतुक शाखा चंद्रपुर, सपोनि विनीत घागे, ठाणेदार पो.स्टे माजरी, सपोनी अजितसिंग देवरे, पोस्टे माजरी, सपोनी बोबडे, स्था. गु.शा. चंद्रपुर, सपोनि भोयर, सपोनी कापडे व स्थानीक गुन्हे शाखा चंद्रपुर स्टाफ, सपोनी मडावी पो.स्टे वरोरा, पोउपनि कोल्हे पोस्टे भद्रावती, सायबर सेल चंद्रपुरचे पोलीस अंमलदार, पोली स्टेशन माजरी येथील पोहवा हरीदास चोपने, पोहवा गजानन जुगडे, पोहवा बंडु मोहुर्ले, पोहवा सुधाकर घाटे, नाप अतुल गुरनुले, नापोअं अनिल बैठा, पोअ गुरु शिंदे, पोअ आकाश चेन्नुरवार, पोअं हरीचंद्र, पोअ रविंद्र गिते, म अक्षिता, पोस्टे बल्लारशा पोअं शरद कुळे, पोअं. संतोष दंडेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे आमने, मधुकर आत्राम यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला असुन आयुष नोपानी (भा.पो.से.) उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरां हे पुढील तपास करीत आहे.

पुराणे आणला तपासात व्यत्यय
सदर आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली . पण कोंढा येथील नाल्याला तसेच शीर नदीला पूर आल्याने आरोपीला भद्रावती पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले . त्यामुळे पोलिसांचा आजचा तपास थांबला असेच म्हणावे लागेल .

Previous Post

चंद्रपूर जि.प.माजी गट नेता डॉ.सतीश वारजुकर यांनी पूर परिस्थिती केली पाहणी

Next Post

इनरव्हील क्लब वरोराचा पदग्रहण सोहळा संपन्न!

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
इनरव्हील क्लब वरोराचा पदग्रहण सोहळा संपन्न!

इनरव्हील क्लब वरोराचा पदग्रहण सोहळा संपन्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
विद्यार्थ्यांच्या विचारांना मिळाले व्यासपीठ; डॉ. किशोर नैताम यांची ५० वी जयंती उत्साहात

विद्यार्थ्यांच्या विचारांना मिळाले व्यासपीठ; डॉ. किशोर नैताम यांची ५० वी जयंती उत्साहात

September 19, 2026
सीजेपी चे अभिजित दिपके यांची भामरागड तालुक्यातील शाळांना भेट; शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव समोर

सीजेपी चे अभिजित दिपके यांची भामरागड तालुक्यातील शाळांना भेट; शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव समोर

September 18, 2026
अहेरीत घरातून ३.५२ लाखांची अवैध दारू जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहेरीत घरातून ३.५२ लाखांची अवैध दारू जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

September 18, 2026
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1