चिमूर :- चिमूर विधानसभेचे समन्वयक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष गट नेता डॉ. सतिश वारजुकर यांनी दि.२२.७.२०२२ ल येरखेडा गट ग्राम पंचायत अंतर्गत कळमगाव येथील पुर परस्थितीची पाहणी केली.
सतत येत असलेल्या मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जिकडे तिकडे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे ,पुराचे पाणी गावात येत असून अनेक कुटुंबे रस्त्यावर आले आहेत कळमगाव येथे काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली येथील शंकर बावणे, कमल श्रीरामे , दवलत श्रीरामे, राष्ट्रपाल गजभे, कुसुम डांगे,यांच्या घराची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली याची माहिती मिळताच कळमगाव येथे जाऊन गरजूंना आर्थिक मदत केली या वेळी,पंचायत समिती चिमूर चे माजी उपसापती तथा अध्यक्ष चिमूर विधानसभा युवक काँग्रेस रोषण ढोक,चिमूर शहर अध्यक्ष अविनाश अगडे, विधानसभा उपाध्यक्ष नागेंद्र चट्टे,तालुका अध्यक्ष पर्यावरण विभाग प्रदिप तळवेकर,जिल्हा महासचिव युवक काँग्रेस गौतम पाटील, मीडिया प्रमुख पप्पु शेख, व गावकरी उपस्थित होते.