शंकरपूर – सध्या विदर्भात अतिवृष्टी होत असून बऱ्याच घटना घडत आहेत, कुठे पूर परिस्थिती कुठे घराची पडझड, तर कुठं वीज पडून जनावरांचा मृत्यू अश्या बऱ्याच घटना होत असून सर्व सामान्य लोकांचे आर्थिक नुकसान होत आहे. अशीच एक घटना चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील अनंता येळणे यांची घराची भीत कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शंकरपूर येथील वार्ड क्रमांक पाच येथे रहिवासी असलेले अनंता येळणे यांचे स्वयंपाक खोलीची भिंत काल रात्री अचानक पडल्यामुळे त्यांचे बरेच आर्थिक नुकसान झाले आहे रात्रीची वेळ असल्यामुळे यात जीवितहानी झाली नाही. यामध्ये बऱ्याच जीवनाशक वस्तू चा भिंतीखाली दबून नुकसान झाली आहे त्यात फ्रीज, गहू तांदूळ, स्वयंपाक खोलीतील बरेच साहित्य यामध्ये पूर्ण पाण्याने ओले होऊन यांचे आर्थिक नुकसान झाले आहे याबाबत त्यांनी वार्ड क्रमांक पाच च्या ग्रामपंचायत सदस्य व पटवारी यांना माहिती दिली आहे. वृत्त लिहितपर्यंत घटनेचा कोणताही पंचनामा झालेल्या नाही तरी या घटनेचा पंचनामा करून शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.