कोरची :- दिव्यांग बांधवांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे तसेच दिव्यांगांनी शासनाच्या योजणांचा लाभ घेऊन आत्मविश्वास अधिक वृद्धिंगत केला पाहिजे असे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी यांनी केली आहे. कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात गडचिरोली आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग शोध अभियान तपासणी व मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सी आर भंडारी, पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेश फाये,कोरची ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ. बी एस धुर्वे, गटशिक्षणाधिकारी यशवंत टेभूर्णे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत, डॉ. शुभम वायाळ, बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव लेपसे,डॉ. स्वप्नील राऊत, डॉ. ज्ञानदीप नखाते, सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
या दिव्यांग शिबिरात तपासणी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातून भिषक डॉ. ओमप्रकाश ढोंगे, अस्थिरोग तज्ञ डॉ रोशन कुमरे, नेत्ररोग तज्ञ डॉ मनोज म्हस्के, बालरोगतज्ञ डॉ मुकेश अत्यालगडे, भौतिक औपचार तज्ञ डॉ.नेहा कांबळे, मानसोपचार समुपदेशक अजय खैरकर या आरोग्य चमूने ३१२ जणांची आरोग्य तपासणी केली आहे. त्यामध्ये लोकोमोटर डिसऑर्डर आणि ऑर्थोपेडिक ९१ तपासणीत मतिमंद ३८, कान,नाक,घसा चे ४३ पैकी ३९ संदर्भित, बालरोग ४२ तपासणीत ०५ अपंग, डोळाचे ७१ तपासणीत १४ अपंग, औषध आणि मनोरुग्ण ६० तपासणीत ४१ किरकोळ समस्येसंबंधीत निघाले असून एकूण ३१२ जणांची तपासणी करण्यात आली.
तसेच मागील शिबिरात नोंदणी केलेल्या ७९ दिव्यांगांना प्रमाणपत्राचे वाटप केले आहे. सध्या नवीन नोंदणी करून अस्थायी स्वरूपात दिव्यांगणा प्रमाणपत्र देण्यात आले आहे व त्यांना २० जुलै नंतर स्वाक्षरीसह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार दिव्यांगाचे अंध, दृष्टीदोष, कर्णबधिर, वाचादोष, अस्थिव्यंग, मानसिक आजार अध्ययन अक्षमता, मेंदूचा पक्षाघात, स्वमग्न, बहुदिव्यांग, कुष्ठरोग, बुटकेपणा, मतिमंद, अविकसित मांसपेशी, मज्जासंस्थेचे तीव्र आजार, मेंदूतील चेतासंस्था संबंधी आजार, रक्तसंबंधी कॅन्सर, रक्तवाहिन्या संबंधित आजार, रक्तसंबंधी रक्ताचे प्रमाण कमी, हल्ला ग्रस्त पीडित, कंपावत रोग असे एकूण २१ प्रकारचे दिव्यांग आहेत. परंतु यामध्ये आजारात ४० टक्के च्यावर दिव्यांगाना अधिक सुविधा तर त्यापेक्षा कमी असणाऱ्यांना सीमित पद्धतीचे योजनाचे लाभ मिळतो.
या शिबिरामध्ये सकाळी दहा वाजता पासून मोठ्या संख्येने तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींनी सहभाग नोंदवला होता त्यामुळे ग्रामीण रुग्णलयात तपासणीसाठी आलेल्याची खूप गर्दी झाली होती परंतु शिबिराचे आयोजकांनी त्यांची योग्य सोय करून दिली तसेच त्यांच्या येण्या-जाण्यासाठी मोटार वाहनांची सोय केली असून त्यांना दुपारून अल्पोपहाराची व्यवस्था सुद्धा केली होती. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचारी,ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी, गटसाधन केंद्र कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतला.प