अमरावती : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज अमरावती जिल्ह्यातील विविध बाबींची माहिती विविध मान्यवरांकडून जाणून घेतली.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे गेल्या दोन दिवसांपासून अमरावती विभागातील बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांच्या दौ-यावर आहेत. काल त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील व आज वाशिम जिल्ह्यातील विविध स्थळांना भेट दिली. या दौ-यादरम्यान त्यांनी प्रशासनासमवेतही चर्चा केली. वाशिम जिल्हा दौरा आटोपल्यानंतर राज्यपालांचे अमरावती येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्यासह विविध मान्यवरांनी राज्यपालांचे स्वागत केले. आमदार रवी राणा, महापौर चेतन गावंडे, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी पालकमंत्री ॲड. ठाकूर व विविध मान्यवरांशी चर्चा करून विविध बाबींची माहिती घेतली.