चंद्रपूर – स्वरसम्राज्ञी, गानकोकीळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातील दैवी स्वर निमाला असून मधुर सुरांचा व महान युगाचा अंत झाला आहे. गायन कलेच्या विविधांगी प्रकारात त्यांनी दिलेल्या अपूर्व योगदानाबद्दल विद्यमान व कित्येक भावी पिढ्या सदैव स्मरण करतील. त्यांच्या दुःखद निधनामुळे देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, संगीत, नाट्य, चित्रापट आदी क्षेत्राशी निगडीत चळवळीची फज्ञर मोठी क्षती झाली असल्याची शोकसंवेदना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी व्यक्त केली आहे.
https://twitter.com/ahir_hansraj/status/1490232139836968960?t=PxXVYWXNHO6Mrf2Rn2ChWQ&s=19
लतादिदींनी आपल्या सुमधुर स्वरांनी शब्दांना साज व अर्थपुर्णतः दिली. त्यांनी गायीलेल्या अनेक भाषांमधील गितांनी श्रोतुवर्ग सदैव न्हाऊन निघायचा. गितांना आपल्या सुरातून जिवंतपणा दिला. त्यांच्या दैवी गायकीने खऱ्या अर्थाने भाषा अलंकृत ठरली आहे अशा महान गानसम्राज्ञींच्या निधनाने संगीत क्षेत्राची अपरीमित हानी झाली आहे. त्यांच्या महान योगदानाचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण.