बोथली अडेगाव येथील मजुरांच्या हाताला मिळाला रोजगार
चिमूर (चंद्रपूर ) चिमूर पंचायत समिती अंतर्गत जाभुळघाटवरून जवळ असलेल्या बोथली गट ग्रामपंचायत मधील अडेगाव येथील मुंडा तलावाचे नहराचे खोलीकरण कामाचे भूमिपूजन दि 6 फेब्रुवारी ला सरपंच मनोहर चौधरी उपसरपंच रामू झोडे याच्या उपस्थिती मध्ये करण्यात येऊन खोलीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली
बोथली गट ग्रामपंचायत अंतर्गत बोथली व अडेगाव येथील शेतकरी मजूरवर्ग यांच्या हाताला काम नसल्याने आणि शेतीची कामे संपल्यामुळे रिकामे होते त्यांनी ग्रामपंचायत ला कामाची मागणी केली असता पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजनातुन नहराचे खोलीकरण कामाची मागणी केली असता तात्काळ काम मंजूर होऊन कामाचे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात करण्यात आली त्यामुळे बोथली व अडेगाव येथील मजूर वर्गात आनंदाची लहर निर्माण झाली आहे हाताला काम भेटल्यामुळे गावकऱ्यांनी ग्रामपंचायती चे आभार मानले आहे
या कामाच्या भूमिपूजनाला सरपंच मनोहर चौधरी उपसरपंच रामू झोडे रोजगार सेवक प्रताप नागपुरे ग्रा प कर्मचारी बलराम नागपुरे विनोद ढोणे झोडे काकाजी शुक्र दडमल शेषराव दडमल संपत चौखे देवराव नागपुरे आणि सर्व कामावर उपस्थित मजूर वर्ग उपस्थित होते