वर्धा:- ०३ जून रोज शुक्रवारला जिल्हा परिषद सभागृह वर्धा येथे जिल्हा विकासाची समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा ) बैठक खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .
.सदर बैठकीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, स्वच्छ भारत मिशन शहरी व ग्रामीण,जल जीवन मिशन कार्यक्रम, सर्व शिक्षा अभियान व इतर एकुण २१ योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी आमदार कुणावार यांनी मतदार संघातील पांदन रस्ता दुरुस्ती करीता २ जेसीबी ची व्यवस्था व डिझेलची व्यवस्था, ,झुडपी जमीनीवरील अतिक्रमण नियमाकुल करणे,सिंदी रेल्वे येथील ज्या ४०० सनदी चुकीच्या पद्धतीने नागरिकांना दिल्या आहेत त्या सनद तातडीने दुरुस्ती करीता शिबिरांचे आयोजन घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्यात. त्याचप्रमाणे सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत लाभार्थींना पट्टे वितरीत करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला आमदार डॉ.रामदास आंबटकर, आमदार दादाराव केचे, जिल्हाधिकारी वर्धा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा, सत्यजित बढे तसेच प्रशासनातील सर्व मुख्य अधिकारी उपस्थित होते.