भद्रावती :- अखिल भारतीय सरपंच परिषदेची भद्रावती तालुका कार्यकारणी गठीत करण्यासंदर्भात अभिषेक मंगल कार्यलय भद्रावती येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी चिमूर सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र कराडे उपस्थित होते. त्यांनी सरपंच यांना विविध योजनाची माहिती दिली तसेच वरिष्ठ सरपंच बंडू ननावरे यांच्या अध्यक्षते खाली पुढील प्रमाणे कार्यकारणी गठीत करण्यात आली.
तालुका अध्यक्ष पदी प्रदीप महाकुलकर, तालुका महिला अध्यक्ष पदी मनीषा रोडे, तालुका उपाध्यक्ष पदी सविता जमदाडे, तालुका सचिव पदी शंकर रासेकर,तालुका उपाध्यक्ष पदी विजय वानखेडे, तालुका सरचिटणीस पदी मोहित लभाने, तालुका मार्गदर्शक पदी अॅड अमोल जिवतोडे, तालुका संघटक पदी सोमेश्वर पेंदाम ,तालुका समन्व्यक पदी मुकेश आसकर ,तालुका सदस्य पदी विलास जिवतोडे ,तालुका कोषध्यक्ष पदी जगदीश चौधरी, तालुका समन्व्यक पदी गोविंदा कुळमेथे, तालुका सरचिटणीस पदी महेंद्र भोयर ,तालुका सदस्य पदी सुनील मोरे ,तालुका संघटक पदी विजय खंगार, तालुका सदस्य पदी अर्चना साव, तालुका सदस्य पदी मंगेश ननावरे ,तालुका सदस्य पदी निरूपला मेश्राम यांची सर्वानु मते निवड करण्यात आली .या बैठकिला अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ प्रमुख अॅड. देवा पाचभाई ,जिल्हाअध्यक्ष प्रशांत कोपूला, धनराज पायघन ,मयूर टोंगे ,चांगदेव रोडे ,छायाताई खापने. ,वैशाली जिवतोडे ,मनीषा ठेंगणे ,दामिनी काकडे, मनीषा तुराणकर, पौर्णिमा ढोक ,सुभाष रोडे, हरिश्चंद्र आसूटकर, विजय ताजने ,संतोष तुराणकर ,प्रफुल टोंगे, छाया खापणे, वैशाली जिवतोडे, मनीषा ठेंगणे ,दामिनी काकडे, मनीषा तुराणकर,पौर्णिमा ढोक ,सुभाष रोडे, हरिश्चंद्र आसूटकर, विजय ताजने तसेच भद्रावती मधील तालुका सरपंच उपसरपंच बैठकीला हजर होते.