ब्रम्हपुरी(चंद्रपूर ) प्रतीनीधी:– वस्त्र मंत्रालयाच्या हस्तशिल्प विभाग यांच्या मार्फतीने गांगलवाडी येथील लोकार्पण बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेच्या वतीने 50 कारागिरांना टूल किटचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक प्रभाकर सेलोकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
तर अध्यक्षस्थानी ब्रम्हपुरी पंचायत समितीचे सभापती रामलाल दोनाडकर, सहउद्घाटक पंचायत समिती उपसभापती सुनीताताई ठवकर हे उपस्थित होते.
तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रशेखर सिंग असिस्टंट डायरेक्टर हस्तशिल्प विभाग नागपुर, प्रेमदास शेंडे मुख्याध्यापक लोक विद्यालय गांगलवाडी, वार्ताहर जगदीश भसाखेत्रे, सामाजिक कार्यकर्ते संजय भोयर, विवेक बनकर सरपंच गांगलवाडी, अनिल तिजारे सरपंच तळोधी खुर्द, उमेश घुले सरपंच मुई, ज्ञानेश्वरजी दिवटे बल्लारपूर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन गांगलवाडी येथील लोकार्पण बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील बन्सोड यांनी केले होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना उपस्थित मान्यवर म्हणाले की, कारागिरांनी डिजिटल मार्केटिंगचा वापर करून अमेझान, फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईट वरती वस्तू विकून आपला व्यवसाय वाढवु शकता. हस्तशिल्प कारागीरांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. नवीन तंत्रज्ञानाची माहिती व प्रशिक्षण, अद्यावत साधनसामुग्री, बाजारपेठ पाहणी, डिजीटल मार्केटिंग, विक्री मेळावा, शासनाच्या विविध योजना ज्यामध्ये मुद्रा लोन, गव्हर्मेंट ई मार्केटप्लस या ई काँमर्स वेबसाईट बद्दल सुध्दा माहिती देण्यात आली. ज्यावर नोंदणी करून कारागीर आपला माल जगभर पोहचवू शकतो. तसेच मुद्रा लोनद्वारे त्यांना अत्यल्प दरावर शासकीय बँकांमार्फत अर्थसहाय्य मिळण्यास मदत होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लोकार्पण बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील बन्सोड यांनी केले, तर आभार पल्लवी बन्सोड यांनी मानले.
यशस्वीतेसाठी संजीव बन्सोड, आकाश तिजारे यांनी सहकार्य केले.