राज्याचे माजी अर्थमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेञाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे केली मागणी
चंद्रपूर:-
सिरोंचा येथे नव्या राष्ट्रीयकृत बंँकेची शाखा उघडण्याची मागणी भाजयुमो चंद्रपूर महानगर
जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन राज्याचे माजी अर्थमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे पाठविण्यात आले.
सदर निवेदनातून कोलावार यांनी म्हणाले की गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा हे शहर जिल्हा मुख्यालयापासून २१२ कि.मी च्या अंतरावर वसलेले आहे.सिरोंचा तालुक्यात जवळपास १४० च्या वर गावांचा समावेश असून शहरात एकच राष्ट्रीयकृत बँक (बँक आॅफ इंडिया) नागरिकांच्या सेवेत आहे.या बँकेत दिवसभर शहर व तालुक्यातील नागरिकांची प्रचंड गर्दी असते.त्यातही या बँकेचा एटी.एम जास्त प्रमाणात बंद अवस्थेतच असल्यामुळे अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
शहरातील एकमेव राष्ट्रीयकृत बँक सोडले तर सिरोंचापासून ११० कि.मी च्या अंतरावर असलेल्या अहेरी याठिकाणी आहे.मागील काही वर्षापासून अहेरी येथील राष्ट्रीयकृत बँक असलेल्या एस.बी.आय शाखेमार्फत सिरोंचा येथे ग्राहक सुविधा केंद्र सुरु केले असून ५०० च्या वर खातेदार आहेत.शहरातील व तालुक्यातील नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे व
तसेच सिरोंचावासी नवीनकुमार जन्नमवार यांचे सूचनार्थ सिरोंचा येथे नवीन १ ते २ राष्ट्रीयकृत बँकेच्या सुरु करण्याची मागणी केली जात आहे. या मागणीच्या अनुषंगाने भाजयुमो चंद्रपूर महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी पुढाकार घेऊन याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे पाठवून वरील बाबीकडे विशेष लक्ष देण्याची विनंती केली आहे.













