वरोरा :- ३१ मे रोज मंगळवार ला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती अहिल्यादेवी होळकर वृध्दाआश्रम येथे पार पडली . या प्रित्यर्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . यात जवळपास ५० दुचाकी स्वारांनी सहभाग घेतला होता. रॅली लमध्ये सर्वांनी पिवळ्या रंगाचे पोशाख आणि दूप्पटे परिधान केले होते . छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन रॅली शहीद योगेश डाहुले स्मारक , महात्मा गांधीच्या पुतळा , बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नमन करून बिरसा मुंडा यांच्या स्मारकाला भेट देऊन कार्यक्रम स्थळी आली.
कार्यक्रमाची सुरूवात सकाळी १० वाजता झाली .कार्यक्रमाचे अध्यक्ष पद गजानन शेळकी यांनी भुषविले . उद्घाटक डाॕ.प्रफुल्ल खुजे वरोरा , तसेच डाॕ .सरोदे साहेब , डाॕ. प्रभाकर लोंढे गोंदीया , समाजसेविका सोनुबाई येवले,संचालिका अहिल्याबाई होळकर वृध्दाश्रम वरोरा , तसेच या कार्यक्रमासाठी छायाताई धवने , अॕड.उज्वला चिडे , ॲड.मुंगल व अहिल्यादेवी उत्सव समिती चे अध्यक्ष अजिंक्य काळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गणेश चिडे , प्रस्तावना संजय बोधे यांनी केली. आभार प्रदर्शन आशिष शेळकी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी बरडे यांनी सर्वांना अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याप्रती प्रामाणिक राहण्याची शपथ दिली. कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात धनगर समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या. उत्सव समिती चे संघटक भूषण झिले यांनी सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली.