भद्रावती:- येथील डाव्या आघाडीतर्फे प्रचंड महागाई व बेरोजगारी विरोधात पाच दिवसांचा देशव्यापी एल्गार पुकारण्यात आला होता याचाच एक भाग म्हणून भद्रावती तहसील कार्यालय समोर निदर्शने करून निवेदन काम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांचे प्रतिनिधी हेमंत तेलंग अव्हल कारकून यांना देण्यात आले.
देशभरात डाव्या पक्षांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – भारतीय कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी) आल इंडिया फारवड ब्लाक – क्रांतिकारी समाजवादी पक्ष – कम्युनिस्ट पार्टी आफ इंडिया ( मार्क्सवादी लेनिनवादी ) लिब्रेशन – शेतकरी कामगार पक्ष – लाल निशाण पक्ष अशा या डाव्या पक्षांनी देशव्यापी आंदोलनाची दिनांक २५ मे ते ३१ मे पर्यंत हाक दिली होती
मागण्या पेट्रोलियम उत्पादना वरील सर्व अधिभार सेस मागे घ्या सार्वजनिक वितरण व्यवस्थे द्वारे ( पी डी एस ) गव्हाचा पुरवठा पूनसर्चचंइत करा. सर्व जीवनावश्यक वस्तू विशेषतः डाळी आणि खाद्यतेल याचे वितरण करून सार्वजनिक वितरण व्यवस्था ( पी डी एस ) मजबूत करा सर्व आयकर न भरणाऱ्या कुटुंबीयांना थेट रोख हस्तारन दरमहा ७५०० रुपये वाढवा रोजगार हमी योजने वरील निधी वाढवा बेरोजगार भात्यासा केंद्रीय कायदा करा. शहरी भागातील रोजगार हमी योजना कायदा करा. सर्व रिक्त पदे भरा इत्यादी मागण्यांचे निवेदन तहसीलदार मार्फत राषट्रपती पंतप्रधान नवी दिल्ली. राज्यपाल मुख्यमंत्री मुंबई जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांना पाठविण्यात आले.निवेदन देते वेळी कॉ राजू गैनवार ,कॉ अरविंद कुमार कॅप्टन, कॉ दिलीप वणकर, कॉ नितीन कावटी, कॉ निलेश गेडाम ,कॉ सुभाष समर्थ ,कॉ दिनकर आस्कर, कॉ प्रमोद दातारकर ,प्रदीप सतारकर ,कॉ बेबी कुळमेथे ,कॉ सुमन मरसकोल्हे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते