प्रतिनिधी चिमूर:- तालुक्यातील मोटेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये दि 19 एप्रिलला शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक ,आशाताई, अंगणवाडी सेविका, परीचालिका यांच्या उपस्थितीत संपूर्ण गावातून मिरवणूक काढुन मोठया उत्साहात शाळा पूर्व मेळावा संपन्न झाला.
केंद्र शासनाच्या नवीन शिक्षण प्रणाली मध्ये स्टार्स प्रकल्पांना समाविष्ट करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन व महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांसाठी शाळा पूर्व तयारी अभियान राबविण्यात येत आहे. याची सुरवात प्रथम महाराष्ट्र राज्यात झाली असून याच अनुशंगाने मोटेगाव जिल्हा परीषद शाळेमध्ये हे अभियान साजरे करण्यात आले आहे.
या अभियानाला सकाळी 7 वाजता जनजागृती प्रभात फेरी काढून सुरवात करण्यात आली. यानंतर मेळाव्याच्या कार्यक्रमाला सुरवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच सुभाष नेवारे ,प्रमुख अतिथी म्हणून दशरथ दडमल अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ,पंचायत समिती गटसाधन केंद्राचे प्रमूख संजय पंधरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना शाळेचे मुख्याध्यापक एस टी कामडी व संजय पंधरे यांनी सांगितले की मागील 2019 पासून शाळा व अंगनवाड्या या बंद असल्यामुळे बालकांची शिक्षणाची गोडी कमी झाली असून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांचे शिक्षण काहीही झालेले नाही त्यामुळे त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी आनंदायी पद्धतीने त्यांना समाविष्ट करण्यासाठी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. असे आपल्या मार्गदशनातून सांगितले यानंतर दखल पात्र बालकांसाठी सात स्टॉल लावून साहित्य वितरित करण्यात आले. संपूर्ण साहित्य मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी गावातील पालक वर्ग विद्यार्थी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.