नवी दिल्ली :– देशातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २,०६७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/FxSmS4xAte pic.twitter.com/DM9IsqfJjL
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) April 20, 2022
सध्या देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या वाढून १२,३४० वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांतील रुग्णसंख्या ही सोमवारच्या तुलनेत ६५ टक्क्यांनी अधिक आहे.
देशातील कोरोना मुक्तीदर ९८.७६ टक्के एवढा आहे. गेल्या २४ तासांत १,५४७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ०.४९ टक्के तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.३८ टक्के आहे.
याआधीच्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य घट नोंदवण्यात आली होती. सोमवारी दिवसभरात १ हजार २४७ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, एक रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान ९२८ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. मंगळवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७६ टक्के तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.३१ टक्के नोंदण्यात आला होता.केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९२ कोटी २७ लाख २३ हजार ६२५ डोस पैकी २० कोटी ५२ लाख ७ हजार २६१ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.देशात आतापर्यंत ८३ कोटी २५ लाख ६ हजार ७५५ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख १ हजार ९०९ तपासण्या सोमवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.