राजुरा : येथील संविधान चौकात सुतार समाज व लोहार समाजाच्या वतीने भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी भगवान विश्वकर्मा यांना अभिवादन करीत जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.
यावेळी बोलताना आमदार देवराव भोंगळे यांनी भगवान विश्वकर्मा यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. भगवान विश्वकर्मा हे सृष्टीचे निर्माते मानले जातात. आपल्या सभोवतालची सृष्टी सुंदर आणि सुसज्ज करण्याच्या कार्यात विश्वकर्मा यांच्या विचारांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण करताना त्यांच्या सेवा, कौशल्य आणि सर्जनशीलतेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला सुभाष शास्त्रकार, महेंद्र बुरडकर, सोनाली धनवलकर, बंडू जयपुरकर, कैलास निवलकर, मधुकर जानवे, सुभाष जानवे, रुपेश जयपुरकर, निखिल निवलकर, शशिकांत धनवलकर, अंकुश कायरकर, संजय जयपुरकर, नरेश जयपुरकर, यशवंत माणूसमारे, कल्पेश माणूसमारे, उषा शास्त्रकार, मंजुषा बुरडकर, दिव्या शास्त्रकार यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, सुतार समाज आणि लोहार समाज बांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून कष्ट, कौशल्य, सर्जनशीलता आणि समाजसेवेचा संदेश देण्यात आला.













