• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

आमदार करण देवतळे यांच्या हस्ते ‘नमो उद्यान’ प्रकल्पाचे भूमिपूजन

Ashish Ghume by Ashish Ghume
June 26, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
आमदार करण देवतळे यांच्या हस्ते ‘नमो उद्यान’ प्रकल्पाचे भूमिपूजन
Spread the Information

वरोरा : विशेष अनुदान निधी 2025-26 अंतर्गत वरोरा शहरातील नागरिकांना आधुनिक व दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. नगर परिषद वरोरा परिक्षेत्रातील मौजा खांजी, सर्व्हे क्र. 169/3 येथील विद्यानगरी हाऊसिंग सोसायटीच्या ओपन स्पेसमध्ये साकारण्यात येणाऱ्या नमो उद्यान प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार करण देवतळे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुंदर, हरित आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणारे हे उद्यान भविष्यात वरोरा शहराच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. लहान मुलांसाठी खेळण्याची सुविधा, युवकांसाठी व्यायामाची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्याचे मार्ग व विश्रांतीची ठिकाणे तसेच पर्यावरण संवर्धनाला चालना देणाऱ्या विविध सुविधांचा या उद्यानात समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे हे उद्यान केवळ विरंगुळ्याचे केंद्र न राहता सामाजिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचेही प्रभावी केंद्र म्हणून विकसित होणार आहे.
यावेळी आमदार करण देवतळे यांनी वरोरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून नागरिकाभिमुख विकासकामांना प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. शहरात अधिकाधिक हरित क्षेत्रांची निर्मिती, मूलभूत सुविधांचा विस्तार आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भूमिपूजन कार्यक्रमास खासदार प्रतिभा धानोरकर, नगर परिषद अध्यक्ष अर्चना ठाकरे, उपाध्यक्ष योगिता नेरकर, नगरसेविका वर्षा पिसाळ, नगरसेवक बंडु देऊळकर, नगर परिषद वरोराचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, स्वीकृत नागसेवक शंभूनाथ वरघणे, नगरसेवक संतोष पवार,नगरसेवक अक्षय भिवदरे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश पिसाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी ‘नमो उद्यान’ प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अशा हरित प्रकल्पांची गरज अधोरेखित करत या उद्यानामुळे सर्व वयोगटातील नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेष अनुदान निधीतून साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे वरोरा शहराला एक आधुनिक, आकर्षक आणि पर्यावरणपूरक विरंगुळा केंद्र मिळणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासाच्या वाटचालीत हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

Previous Post

मोठी स्वप्ने पाहा… ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा;राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश

Next Post

कळमगाव येथे वीज कोसळून महिला ठार; आठ महिला जखमी

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
कळमगाव येथे वीज कोसळून महिला ठार; आठ महिला जखमी

कळमगाव येथे वीज कोसळून महिला ठार; आठ महिला जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1