• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

एका शेळीसाठी पुन्हा जंगलात गेला अन् परतलाच नाही… वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

Ashish Ghume by Ashish Ghume
June 19, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
एका शेळीसाठी पुन्हा जंगलात गेला अन् परतलाच नाही… वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत
Spread the Information

तळोधी (बा.) वार्ताहर :–
नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. गिरगाव येथील रहिवासी आत्माराम दसरू बोरकर (वय ५२) यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. हरवलेल्या एका शेळीच्या शोधासाठी पुन्हा जंगलात गेलेल्या आत्माराम यांना आपला जीव गमवावा लागल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम बोरकर हे गुरुवारी (दि. १८ जून) नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेले होते. सायंकाळी घरी परतल्यानंतर एक शेळी जंगलातच राहिल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पशुपालन हा त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार असल्याने त्यांनी कोणतीही तमा न बाळगता हरवलेल्या शेळीच्या शोधासाठी पुन्हा जंगलाची वाट धरली. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
रात्र झाली तरी आत्माराम घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली. पत्नी, मुले आणि नातेवाईकांनी रात्रभर त्यांच्या प्रतीक्षेत डोळे लावून ठेवले. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली असता त्यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. ही बातमी गावात पोहोचताच संपूर्ण गिरगाववर शोककळा पसरली.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक महेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. कन्नमवार, क्षेत्र सहाय्यक हिंगणघर, पोलीस निरीक्षक राहुल गुहे व त्यांचे पथक तसेच वनविभागाचे मागवा मजूर घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली असून मृताच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आत्माराम बोरकर हे अत्यंत कष्टाळू, मनमिळावू व शांत स्वभावाचे शेतकरी म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावाने एक मेहनती व सज्जन व्यक्तिमत्त्व गमावले आहे. घराबाहेर पडताना आपल्या प्रियजनांना तो शेवटचा निरोप ठरेल, याची कल्पनाही त्यांना नव्हती. एका मुक्या प्राण्याच्या शोधासाठी गेलेला हा शेतकरी कायमचा निघून गेल्याने गावकऱ्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वनविभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

Previous Post

गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी ५३० कोटींची विकासयोजना;जिल्हा नियोजन समितीत पर्यटन व उद्योगांना नवी संजीवनी

Next Post

आलापल्ली–सिरोंचा महामार्गावर पुन्हा जीवघेणा प्रवास:पहिल्याच पावसात रपटे गेले वाहून

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
आलापल्ली–सिरोंचा महामार्गावर पुन्हा जीवघेणा प्रवास:पहिल्याच पावसात रपटे गेले वाहून

आलापल्ली–सिरोंचा महामार्गावर पुन्हा जीवघेणा प्रवास:पहिल्याच पावसात रपटे गेले वाहून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1