• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

पिशोर परिसरात डिझेल टंचाई शेत मशागतीची कामे खोळंबली शेतकऱ्यांची गैरसोय

Ashish Ghume by Ashish Ghume
May 26, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
पिशोर परिसरात डिझेल टंचाई शेत मशागतीची कामे खोळंबली शेतकऱ्यांची गैरसोय
Spread the Information

पिशोर प्रतिनिधी जावेद शेख

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीची लगबग सुरू असतानाच पिशोर व परिसरात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. डिझेल मिळत नसल्याने शेत मशागतीची कामे ठप्प झाली असून ट्रॅक्टरची चाके थांबल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.
पिशोर येथील चौधरी पेट्रोल पंप व लोकसेवा पेट्रोल पंपावर डिझेल मिळवण्यासाठी मागील चार-पाच दिवसांपासून शेतकऱ्यांना तब्बल एक ते दीड किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. डिझेल टंचाईच्या अफवेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने पहाटेपासूनच शेतकरी ट्रॅक्टर, पिकअप, जेसीबी, दुचाकी तसेच रिकामे कॅन घेऊन पेट्रोल पंपावर धाव घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सध्या खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीची कामे जोरात सुरू असून वखरणी, नांगरणी आणि पेरणीपूर्व तयारीची मोठी लगबग आहे. अशातच डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. तासन्तास उन्हात उभे राहूनही इंधन मिळेल की नाही, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाले होते.
प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज डिझेलचा टँकर येत असला तरी वाढत्या मागणीमुळे तो अपुरा पडत असल्याचे चित्र आहे. डिझेलचा साठा संपणार असल्याच्या अफवेमुळे परिसरात घबराट पसरली आणि अनेकांनी आपली शेतीची कामे बाजूला ठेवून थेट पेट्रोल पंपाकडे धाव घेतली. रांगेत नंबर लावण्यावरून काही काळ गोंधळाचे वातावरणही निर्माण झाले होते.
अखेर पोलीस व प्रशासनाच्या मध्यस्थीने तसेच अतिरिक्त टँकर उपलब्ध झाल्याने परिस्थिती काही प्रमाणात निवळली. मात्र, पुन्हा अशी टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने इंधन पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शेतीची कामे ऐन रंगात असताना डिझेलसाठी दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. ट्रॅक्टर बंद असल्याने मशागतीची कामे खोळंबली आहेत. प्रशासनाने तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करावा,अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

Previous Post

भामरागड येथे सर्वात दूर, सर्वात पहिले अभियानअंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे भव्य जनभागीदारी शिबीर

Next Post

“एमआयडीसी” प्रकल्पाविरोधात गोंडपिपरीत आक्रोश

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
“एमआयडीसी” प्रकल्पाविरोधात गोंडपिपरीत आक्रोश

"एमआयडीसी" प्रकल्पाविरोधात गोंडपिपरीत आक्रोश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1