• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

भामरागड येथे सर्वात दूर, सर्वात पहिले अभियानअंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे भव्य जनभागीदारी शिबीर

govind chakravarti by govind chakravarti
May 25, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
भामरागड येथे सर्वात दूर, सर्वात पहिले अभियानअंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे भव्य जनभागीदारी शिबीर

Oplus_16908288

Spread the Information

भामरागड:-भामरागड आणि एटापल्ली तालुक्यातील आदिवासी समुदायांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने भामरागड तालुका मुख्यालयात आदिवासी विकास विभागामार्फत भव्य एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कार्यरत आहे.तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या हक्काचे आणि महत्त्वाचे कार्यालय अशी या कार्यालयाची ओळख आहे. या ठिकाणाहून आदिवासी बांधवांच्या प्राथमिक गरजा, सोय-सुविधा, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी यांसारख्या विविध पैलूंवर एकत्रितपणे काम केले जात आहे.
मात्र तालुक्यातील अतिदुर्गम आणि दळणवळणाच्या सोय नसलेल्या भागांतील आदिवासी बांधवांपर्यंत विकास अद्याप पुरेसा पोहोचलेला नाही. त्यामुळे या वंचित आणि अत्यल्प लाभ घेतलेल्या आदिवासी बांधवांसाठी जनभागीदारी – सर्वात दूर, सर्वात पहिले या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानांतर्गत अतिदुर्गम आणि शेवटच्या घटकांतील नागरिकांपर्यंत शासनाच्या आणि आदिवासी विकास विभागाच्या कल्याणकारी योजना थेट पोहोचविण्यासाठी हे जनभागीदारी शिबीर घेण्यात आले.या शिबिराला बिनागुंडा, पेरमिलभट्टी, तुर्रेमर्का, कुव्वाकोडी, फोदेवाडा, कुमणार आणि गुंडेनूर या गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोषना चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समिती भामरागडचे गट विकास अधिकारी महेश वाढई आणि बाल विकास अधिकारी राहुल जांभुळे हे आवर्जून उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोषना चव्हाण म्हणाल्या,भौगोलिकदृष्ट्या अतिशय दुर्गम असलेल्या भामरागड तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ मिळवून देणे हे आमचे मुख्य कर्तव्य आहे.सर्वात दूर, सर्वात पहिले या संकल्पनेचा आधार घेऊन आम्ही शेवटच्या गावांतील प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचत आहोत आणि जनभागीदारीतून विकास साधण्याचा प्रयत्न करत आहोत.
या विशेष शिबिरात नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.आदिवासी विकास विभागामार्फत वैयक्तिक वनहक्क दाव्यांसाठी जवळपास 90 ते 100 प्रस्ताव तयार करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या हक्काच्या जमिनीचा प्रश्न जलदगतीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे तसेच वैयक्तिक वनहक्क आणि सामूहिक वनहक्क याबत सर्व माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य तपासणी,औषधोपचार,आयुष्मान भारत कार्ड आणि आभा कार्ड वाटप करण्यात आले. नवीन आधार कार्ड नोंदणी तसेच जुन्या आधार कार्डमधील त्रुटी दुरुस्ती आणि अद्ययावत करणेही करण्यात आले. महिला व बालविकास विभाग आणि कृषी विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि मार्गदर्शनही लाभार्थ्यांना देण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय भामरागड येथील अधिकारी, कर्मचारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी यांनी विशेष परिश्रम घेतले.

RelatedPosts

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

Previous Post

​इंधन दरवाढ आणि तुटवड्याचा आगळा-वेगळा निषेध: उमरखेड युवक काँग्रेसतर्फे वाहनधारकांना वाटले ‘मेलोडी’ चॉकलेट

Next Post

पिशोर परिसरात डिझेल टंचाई शेत मशागतीची कामे खोळंबली शेतकऱ्यांची गैरसोय

govind chakravarti

govind chakravarti

Next Post
पिशोर परिसरात डिझेल टंचाई शेत मशागतीची कामे खोळंबली शेतकऱ्यांची गैरसोय

पिशोर परिसरात डिझेल टंचाई शेत मशागतीची कामे खोळंबली शेतकऱ्यांची गैरसोय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1