भिगवण :
पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणाऱ्या टाटा पंच (क्रमांक एमएच ५५ बी ३५६०) या कारला मागून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
अपघात इतका भीषण होता की कारच्या मागील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. कारची मागील काच पूर्णपणे फुटली असून डाव्या बाजूचा भाग चेपला गेला आहे. तर धडक देणारी हिरो स्प्लेंडर दुचाकी रस्त्यावर पडून मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्याचे दिसून आले.
या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जखमी झाले असून, त्यांना तातडीने भिगवण येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रस्त्यावर विखुरलेले दुचाकीचे अवशेष आणि वाहनांची अवस्था पाहता अपघाताची तीव्रता लक्षात येत आहे. जखमी तरुणांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.












