छत्रपती संभाजीनगर ( के. प्रशांत ):-
आजी म्हणजे कुटुंबाचा पाया आणि ज्ञानाचा व संस्कारांचा खजिना मानला जातो.आजी ही घरातील सर्वात ज्येष्ठ आणि प्रेमळ व्यक्ती असते. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. एका २८ वर्षीय तरुणाने ८० वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला असून घटनेची माहिती मिळताच, पाचोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले
८० वर्षीय महिलेवर बलात्कार
पोलिसांनी आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय व्हॅली रुग्णालयात नेले. या घृणास्पद गुन्ह्याची बातमी पाचोड आणि आसपासच्या परिसरात पसरताच लोकांमध्ये संताप उसळला. 1 जूनच्या रात्री पाचोड पोलीस ठाण्याबाहेर संतप्त लोकांचा मोठा जमाव जमला. संतप्त लोकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला कडक शिक्षा देण्याची मागणी केली.
पैठण तालुक्यातील पाचोड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पाचोड इथल्या कल्याणनगर परिसरात पिडीत वृद्ध महीला राहते. सोमवारी दुपारच्या वेळी या भागात जोरात वारा सुटला होता. त्यात ही महीला अडकली होती. त्याच वेळी तिथे रोहन आहेर हा नराधम होता. त्याने महीलेची स्थिती पाहीली. त्याच वेळी तिचा गैरफायदा घेण्याचं त्याने ठरवलं. त्याने तिला मदत करतो असं सांगितलं. तिला ही त्याचा आधार वाटला. पण पुढे काय वाढून ठेवलं आहे याची कल्पनाही तिने केली नसेल. मदतीच्या बहाण्याने तो तिला आपल्या घरात घेवून गेला.
घरात गेल्यानंतर रोहनने त्या वृद्ध महीले सोबत जबरदस्ती करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने लैंगिक अत्याचार ही केले. यावेळी तीने आरडाओरडा केला. हा आरडाओरडी ऐकून परिसरातील नागरिक आणि महिलांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लोकांनी रोहनच्या तावडीतून त्यांना सोडवले. याबाबत माहिती महीलेच्या नातेवाईकांना देण्यात आली. ते ही तिथे उपस्थित झाले. त्यानंतर तिला पाचोड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक राम बारहाते करीत आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या पाचोड येथील कल्याणनगर परिसरात ही माणूसकीला काळिमा फासणारी आणि तेवढीच संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणाचे पडसाद उमटत आहे. लोकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. तरुणी मुली असुरक्षित आहेतच पण आता वृद्ध महिलांवर ही अत्याचार होत आहे. कायद्याचा कुणाला धाक राहीला आहे की नाही असा संतप्त सवाल नागरीक करत आहेत. दरम्यान या प्रकरणी आरोपी तरूणाला पोलीसांनी अटक केली आहे.













