गोंडपिपरी : ( सुरज माडूरवार )
गोंडपिपरी येथील स्व. लक्ष्मणराव ज. कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल यंदा उल्लेखनीय लागला असून विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे.कला व विज्ञान या दोन्ही शाखांमध्ये विद्यार्थ्यांनीनी चांगली कामगिरी करत महाविद्यालयाचा लौकिक वाढवला आहे.
कला शाखेत विजयालक्ष्मी विजय अंबटकर हिने 81.67 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.अचल दुष्यांत लिंगे याने 77.83 टक्के गुणांसह द्वितीय स्थान मिळवले,तर वैष्णवी शंकर धंदरे हिने 74.67 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.विज्ञान शाखेत कु. भारती किशोर अलोने हिने 70.67 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. कु. वसुंधा सुनील नवघडे हिने 67.34 टक्के गुण मिळवत द्वितीय स्थान मिळवले, तर कु. स्नेहल राजू कस्तुरे हिने 67.00 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
महाविद्यालयाचा एकूण निकालही समाधानकारक लागला आहे. विज्ञान शाखेत सर्व 77 विद्यार्थी उत्तीर्ण होत 100 टक्के निकाल लागला आहे. कला शाखेत 80 पैकी 75 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 93.75 टक्के निकाल नोंदवला गेला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. राजेश नरहरशेट्टीवार, उपाध्यक्ष मा. सारिका माडुरवार,सचिव मा. अजय माडुरवार व सदस्य मा. संभुजी येलेकर यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. प्राचार्य मा. पी. एस. बामनकार तसेच प्रा. हूलके, प्रा. सातगरे, भोये सर, बावणे सर, प्रा. बाटावे मॅडम, निमगडे मॅडम आणि टोंगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे.













