भामरागड :- भामरागड तालुका मुख्यालयाला लागून पर्लकोटा नदी असून त्यावर खूप अरुंद आणि ठेंगना पूल असल्याने दरवर्षी पावसाळ्यात पूर्णपरिस्थिती उद्भवत असते आणि पूर्ण भामरागड शहर व भामरागड येथील मुख्यबाजारपेठ पाण्याखाली जात असते यात येथील व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत होते. मात्र 2019 ला आलेल्या महापूर ने केलेल्या कहरमुळे शासनाचे लक्ष वेधले गेले आणि भामरागड येथील पर्लकोटा नदीवरील पूल 2020 ला मंजूर करण्यात आला.आत्ता मात्र या पुलाच्या बांधकामाने भामरागड येथील संपूर्ण बाजारपेठेत शतीग्रस्त होत असल्याने येथील व्यापारी वर्ग याचा विरोध करून पर्यायी जागेची मागणी करत आहेत. मात्र शासन स्तरावरून या पुलाच्या कामाला दिरंगाई न करता लवकरात लवकर पूर्ण करण्याचे ताकीद दिली जातं असल्याने येथील व्यापारी वर्गांचे अतिक्रमण हटविणे बंधनकारक झाला आहे. मात्र असा करत असतांना एखाद्या व्यापारी किंवा व्यक्ती कडून अनुचित घटना घडू नये म्हणून कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली यांनी उपविभागीय अधिकारी भामरागड यांना लेखी पत्र देऊन पोलीस बंदोबस्त पुरविण्याचे मागणी केले आहे.यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. १३० डी वरील भामरागड येथील पर्लकोटा नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग, गडचिरोली तर्फे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे. त्याअनुषंगाने अतिक्रमण काढण्यापूर्वी अतिक्रमण धारकांना नोटीस वाटप करण्यात येणार असून सदर अतिक्रमण नोटीस दि. २८/०४/२०२६ पासून सुरू करण्यात येणार आहे. नोटीस वाटप तसेच रस्ता हद्दीमध्ये पेंट, चुना मार्किंग करणेकरीता अतिक्रमण धारकांकडून कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे.
करीता अतिक्रमण नोटीस वाटप तसेच पुढील रस्ता हद्द मार्किंग कार्यवाहीकरिता आवश्यक तेवढा पोलीस बंदोबस्त वरील तारखेपासून उपलब्ध करून द्यावा अश्याप्रकारच्या नोंदि करून पत्र दिले आहे.मात्र व्यापारी वर्ग आपल्या उदरनिर्वाच्या प्रश्नासाठी काय करतील याचे मार्गदर्शक सूचना कोठेही नमूद नसल्याने भामरागड येथील व्यापारी वर्गात तीव्र नाराजीचे लाट पसरली आहे.













