• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Education

बहुचर्चित ‘महागाव हत्याकांड’ प्रकरणातील आरोपीस उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
May 1, 2026
in Education
Reading Time: 1 min read
A A
0
बहुचर्चित ‘महागाव हत्याकांड’ प्रकरणातील आरोपीस उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
Spread the Information

गडचिरोली: जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील महागाव येथे एकाच कुटुंबातील पाच जणांच्या विषप्रयोगाद्वारे झालेल्या हत्येच्या बहुचर्चित प्रकरणात आरोपी रोजा रामटेके हिला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

RelatedPosts

शालेय जीवनामध्ये सुंदर हस्ताक्षर महत्त्वपूर्ण : राहुल चातुर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हस्ताक्षर स्पर्धेचे प्रमाणपत्र वितरण

तर्डोबाचीवाडी शाळेचा जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने गौरव

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक-शिक्षक संवाद महत्त्वाचा – पृथ्वीराज पाटील एकंबेकर

सदर प्रकरणात अन्न व पाण्यातून विष देऊन आधी पती-पत्नी, त्यानंतर विवाहित मुलगी, तसेच मावशी व मुलाची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सून संघमित्रा कुंभारे आणि मामी रोजा रामटेके यांच्यावर भारतीय दंड संहिता, १८६० मधील कलम ३०२, ३०७, ३२८, १२०-ब, २०१ तसेच कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

सदर आरोपीचा जामीन अर्ज यापूर्वी अहेरी येथील फौजदारी न्यायालयाने दोन वेळा फेटाळला होता. २०२४ साली मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेला जामीन अर्जही नाकारण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आरोपीकडून जामीनासाठी अर्ज करण्यात आला.

दिनांक ३० एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. न्यायालयाने निरीक्षण केले की, तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या प्रकरणांमध्ये जलद न्यायप्रक्रिया हा मूलभूत हक्कांचा भाग आहे. सदर प्रकरणात रोझा ही अडीच वर्षांहून अधिक काळ कारावासात असून, अद्याप खटल्याची प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याचे दिसते. प्रकरणात ४८ साक्षीदार असून, या गतीने खटला चालू राहिल्यास आरोपीला वर्षोनुवर्षे कारावासात राहावे लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, केवळ गुन्ह्याच्या गांभीर्याच्या आधारावर आरोपीला अनिश्चित काळासाठी कारावासात ठेवणे योग्य ठरत नाही, असे नमूद करत माननीय न्यायमूर्ती महेंद्र नेरलीकर यांनी कडक अटींसह जामीन मंजूर केला.

या प्रकरणात आरोपी रोजा प्रमोद रामटेके हिच्या वतीने अॅड. कुलदीप महल्ले, अॅड. बोधी रामटेके यांनी कामकाज बघितले. तर शासनाच्या वतीने सरकारी वकील अॅड. चौके यांनी युक्तिवाद केला.

————————————–
अनेक कैदी वर्षोनुवर्षे तुरुंगात आहेत. त्यांच्यावरील केसेस अत्यंत संथ गतीने सुरू असतात. आरोपीसह कुटुंबियांचे जीवन न्यायालयीन प्रक्रियेत व्यथित होते. सर्वोच्च व उच्च न्यायालयाने वेळोवेळी जलद न्यायप्रक्रियेची मांडलेली भूमिका वास्तवात आली पाहीजे. रोझाला मिळालेला जामिन हा वर्षोनुवर्षे केसेसमध्ये कोणतीही प्रगती नसताना आरोपीचे वैयक्तिक स्वातंत्र्य वर्षोनुवर्षे बाधित ठेवता येणार नाही ही बाब अधोरेखित करणारा आहे असे मत ॲड. बोधी रामटेके यांनी मांडले.

Previous Post

महिलांसाठी ‘आदिशा’ प्रकल्प गेम चेंजर ठरेल: सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

Next Post

विकास, शांतता व हरित जिल्ह्याच्या दिशेने वेगवान वाटचाल:सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
विकास, शांतता व हरित जिल्ह्याच्या दिशेने वेगवान वाटचाल:सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

विकास, शांतता व हरित जिल्ह्याच्या दिशेने वेगवान वाटचाल:सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1