गडचिरोली :जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या छत्तीसगड मधील बीजापूर जिल्ह्यात संविधान दिनानिमित्त शांततेचा संदेश देत 41 माओवाद्यांनीमाओवाद्यांनी आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनःप्रवेश केला. या सर्व माओवाध्यांवार एकूण 1 कोटी 19 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. त्यापैकी 12 महिला आणि 29 पुरुष असून त्यांनी हिंसक मार्गाचा त्याग करून शांती व विकासाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
या आत्मसमर्पितांमध्ये पीएलजीए बटालियन क्रमांक 1, कंपनी सदस्य, एसीएम, प्लाटून आणि एरिया कमिटी सदस्य, मिलिशिया कमांडर तसेच जनताना सरकार, DAKMS आणि KAMS या जनसंघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्वजण “पूना मारगेम: पुनर्वसनातून पुनर्जीवन” या छत्तीसगड शासनाच्या योजनेत सहभागी झाले आहेत.
राज्य शासनाच्या सर्वसमावेशक नक्सल निर्मूलन धोरणासोबतच शांती, संवाद आणि विकासावर आधारित प्रयत्नांमुळे दक्षिण बस्तर परिसरात स्थायी शांततेची पायाभरणी झाली आहे. स्थानिक पोलीस, सुरक्षा दल, प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हिंसेची संस्कृती बदलत विकास आणि संवादाची नवी दिशा मिळत आहे.या आत्मसमर्पण मोहिमेत डीआरजी, एसटीएफ, कोब्रा, केरिपू तसेच बस्तर फायटर्स दलांचे विशेष योगदान राहिले. त्यांच्या सक्रियतेमुळे आणि संवेदनशील दृष्टिकोनामुळे अनेक माओवादी आता हिंसेचा मार्ग सोडून सामाजिक जीवनात परत येत आहेत.

छत्तीसगड सरकारची पुनर्वसन धोरण माओवाद्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. ‘पूना मारगेम’ योजनेमुळे ते आत्मसन्मानाने आणि निर्भयतेने नव्या जीवनात पाऊल ठेवू शकतात.या आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना शासनाच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत तत्काळ 50,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच सुरक्षित आणि मानवी प्रतिष्ठेचे जीवन जगण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.
-डॉ. जितेंद्र कुमार यादव
पोलीस अधीक्षक बिजापूर













