गोंडपिपरी (सुरज माडूरवार) :- वाघाला जेरबंद करण्याची मागणी तीव्र झाली आहे.संपूर्ण गावकरी व तालुक्यातील हजारो नागरिक (२७) सोमवारी घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले असून हजारोच्या संख्येने चंद्रपूर अहेरी राष्ट्रीय महामार्ग संतप्त हजारो नागरिकांनी गोंडपिपरि येथील धाबा टर्निंग पॉईंटवर रस्ता रोखून धरला.घटनास्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
गोंडपिपरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नुकतेच तालुक्यातील चेकपिपरी येथे शेतकरी भाऊजी पाल यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच,एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गनेशपिपरी गावात दि.२६ रविवारी शेतात जनावरांसाठी चारा कापताना महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याने पुन्हा एकदा वाघाच्या दहशतीने तालुका हादरला आहे.
गणेशपिपरी गाव लागून असल्याने चेकपिपरी येथील वाघाच्या हल्ल्यानंतर शेतात काम करायला मजूर मिळेनासे झाल्याने स्वतःच्या शेतात अल्का पांडुरंग पेंदोर वय ४३ व पती पांडुरंग पेंदोर हे दोघे शेतात गेले.काम आटोपल्यानंतर पती घराकडे परतले पत्नी अल्का जनावरांना चारा आणतो तुम्ही जात रहा बोलले.पती पांडुरंग घरी गेले अर्धा एक तास लोटून पत्नी घरी पोहचली नाही.त्यानंतर गावकरी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून शोधमोहीम राबवली असता सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अल्का पेंदोर हिचा मृतदेह आढळला.अलका पेंदोर या गणेशपिपरी येथील रहिवासी असून त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.गणेशपिपरी हे गाव गोंडपिपरीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असून, या घटनेने गावात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नुकत्याच चेकपिपरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर ग्रामस्थ आणि शेतकरी वर्ग वाघाला जेरबंद करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. परंतु, अद्याप वाघाचा बंदोबस्त करण्यात वनविभागाला यश आलेले नाही.परिणामी परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत आणि शेतात जाण्यास घाबरू लागले आहेत.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी गौरकर,गोंडपिपरी क्षेत्र सहाय्यक पुरी, ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत पुढील कार्यवाही सुरू केली.वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले असून,वाघाला पकडण्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या आठ दिवसांत दोन व्यक्तींचा बळी घेतल्याने या भागात वाघाचा वावर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या दोन्ही घटनांमुळे तालुक्यातील ग्रामीण भागात चिंता व अस्वस्थता निर्माण झाली असून,वाघाला जेरबंद करण्याची मागणी तीव्र झाली आहे.संपूर्ण गावकरी व तालुक्यातील हजारो नागरिक (२७) सोमवारी घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले असून हजारोच्या संख्येने चंद्रपूर अहेरी राष्ट्रीय महामार्ग संतप्त हजारो नागरिकांनी गोंडपिपरि येथील धाबा टर्निंग पॉईंटवर रस्ता रोखून धरला.घटनास्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिस उपविभागीय अधिकारी सत्यजित आमले परस्थिती हाताळत आहे.आंदोलनात तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व राजकीय पदाधिकारी एक दिलाने सहभागी झाले होते.













