कुछ रास्ता लिख देगा, कुछ मैं लिख दूंगा,
तुम लिखते जाओ मुश्किल, मैं मंजिल लिख दूंगा…
ही शायरी जणू वैभव कुशाबराव पिंपळशेंडे यांच्या जीवनाचा आरसा आहे. वैभव म्हणजे आवाज, जो गगनाला भिडतो; प्रेरणा, जी बदलाची ज्वाला पेटवते; आणि मावळा, जो सामाजिक न्यायासाठी न थकता लढतो.
पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना (कवठी) या लहानशा गावातून वैभवचा प्रवास सुरू झाला. शिक्षक वडिलांच्या घरात शैक्षणिक वातावरण आणि पुस्तके यांच्या भोवती घडलेले बालपण, त्याला नेहमी विचार करण्यास प्रवृत्त करत असे. लहानपणापासून शिक्षणासाठी गावोगाव फिरण्याचा अनुभव आणि नवीन ठिकाणी जुळवून घेण्याची क्षमता, यामुळे त्याचा आत्मविश्वास गडबडून वाढला.
इंजिनिअरींग व एमबीए नंतर पुण्यातील एका नामांकित कंपनीत उच्च पगाराची नोकरी मिळाली, पण त्याच्या हृदयात समाजासाठी काहीतरी करण्याची वेगळीच तळमळ होती. कार्पोरेट जीवनाच्या भिंतींमध्ये अडकून राहणे त्याला समाधान देऊ शकले नाही. त्याची माणसं, त्याचे गाव, त्याचे लोक हेच त्याला पुन्हा गावाकडे खेचून आणले.
कोरोना काळात लोकांची दुर्दशा पाहून वैभव हादरला. त्याने ठरवले समस्यांवर भाषण नव्हे, कृती केली पाहिजे.लोकांच्या अडचणींवर हात पुढे करणारा हा निर्णय त्याला समाजसेवेच्या नवनिर्मित मार्गावर घेऊन गेला. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, अपंग आणि निराधार लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्याने स्वतः पुढाकार घेतला. लोकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोचवणे आणि कायद्याच्या चौकटीत राहून उपाय शोधणे हे त्याचे वैशिष्ट्य बनले.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत वैभव घटनास्थळी धावून जायचा. अपघातग्रस्तांना स्वतःच्या गाडीने दवाखान्यात पोचवणे, शववाहिनी उपलब्ध नसल्यास मृतदेह स्वतः नेऊन देणे अशा अनेक कथा गावकरी आजही जिवंत आठवतात. या निस्वार्थ सेवेमुळे तालुक्यात त्याला ‘आरोग्यदूत’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
२०२२ मध्ये गावकऱ्यांच्या आग्रहाखातर वैभवने ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि अवघ्या एका मताने विजय मिळवला. हा विजय फक्त त्याचा नाही, तर विकासाची नवी वाट दाखवणारा एक संदेशही होता. ग्रामसभेत लोकांना बोलण्याची संधी देणे, त्यांच्या सूचनांवर काम करणे, प्रत्येक समस्येकडे प्रामाणिकपणे लक्ष देणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट झाले.
भाजपात अनेक उपक्रम राबवल्यानंतरही, जर सामान्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्याला जाणवले, तर त्याने सत्ता सोडून जनतेच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्याच्या क्रांतिकारी विचारांचा पुरावा ठरला.
संतोषसिंह रावत आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत वैभवने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचा उद्देश एकच होता जनतेचा आवाज बनणं.युवकांमधील लोकप्रिय नेतृत्व, प्रामाणिकपणा आणि जनतेसाठी असलेली निस्वार्थ बांधिलकी यामुळे काँग्रेसने त्याला महत्त्वाची जबाबदारी दिली, जी त्याने यशस्वीरीत्या पार पाडली.
टोक गावातील ७५ वर्षांपासून थांबलेली घरकुल योजना आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव – या गंभीर समस्यांसाठी वैभवने प्रशासनाशी झुंज दिली. या लढ्यामुळे ५१ घरकुल मंजूर झाले आणि गंगापूर व टोक येथे जलशुद्धीकरण केंद्र सुरू झाले. हीच त्याच्या ‘फायटर स्पिरीट’ची खरी झलक होती.
चेकठाणेवासना येथे युवकांसाठी वाचनालय, क्रीडा साहित्य, व्यायामशाळा उपलब्ध करून देणे, स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांद्वारे नव्या पिढीला सकारात्मकतेचा धडा देणे या कामांनी त्याला स्थानिक युवकांसाठी प्रेरणास्थान बनवले. त्याचं घोषवाक्य आज प्रत्येकाच्या तोंडी आहे एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत वैभव पिंपळशेंडे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची प्रबल शक्यता आहे. लोकांत त्यांच्याबद्दल प्रचंड विश्वास आणि आदर आहे, आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचाही आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे. लोकांच्या मनात एकमत आहे तो लढेल तर जिंकेलबीआणि म्हणूनच घोषवाक्य ठरलेय व्ही फॉर व्हिक्टरी, व्ही फॉर वैभव
वैभव पिंपळशेंडे यांचा प्रवास हे सिद्ध करतो की प्रामाणिक सेवा, निस्वार्थ योगदान आणि क्रांतिकारी विचार यांचा संगम समाजात खरोखर बदल घडवू शकतो. खेड्यातून सुरू झालेला हा प्रवास आता संपूर्ण तालुक्यात प्रेरणास्थान ठरला आहे, आणि त्याचा प्रत्येक निर्णय जनतेच्या हक्कासाठी उभा आहे.
कृषभ बुरांडे पोंभुर्णा













