• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

आनंदाचा शिधा वर पुन्हा गदा.?

सण आले काही निघून गेले तरी आनंदाचा शिधा मिळेना.

admin by admin
October 7, 2025
in महाराष्ट्, मुंबई
Reading Time: 1 min read
A A
0
आनंदाचा शिधा वर पुन्हा गदा.?
Spread the Information

ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी सणासुदीचा काळ म्हणजे आनंदाचा श्वास असतो. पण या आनंदात महत्वाची भूमिका बजावणारा शासनाचा ‘आनंदाचा शिधा’ दीड वर्षांपासून गायब झालेला आहे. यंदाही गणेशोत्सव, नवरात्र, दसरा सण संपले तरी गरीबांच्या वाट्याला आनंदाचा शिधा आलेला नाही. त्यामुळे यावर्षीही सण साजरा करण्याच्या आशा मावळल्या.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

महायुती सरकारने पुन्हा सत्तेत येण्यासाठी अनेक लोकप्रिय योजना आणि घोषणांचा सपाटा लावला होता. मात्र, सत्तेत आल्यानंतर आर्थिक तुटवडा येत असल्याचे कारण पुढे करत राज्य सरकारने या योजनांना निधी पुरवठा करण्यात हात आखडता घेतला आहे. त्यामुळे अनेक योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील एक योजना म्हणजे आनंदाचा शिधा वाटप योजना. ही योजना बंद होणार की चालू राहणार असा सवाल आता सामान्य जनतेकडून विचारला जात आहे.

तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात शिवजयंती, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी यानिमित्ताने राज्य सरकारने आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात केली होती. परंतु गेल्या गणेशोत्सवाच्या काळात तो देण्यात आला नाही. त्यामुळे या योजना सुरु आहेत की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. अखेर ही योजना बंद होणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत प्रसारीत झाल्या आहेत. त्यामुळे या दिवाळीत या योजनेच्या अंतर्गत हा आनंदाचा शिधा जनतेला मिळणार आहे की नाही याबाबत जनतेच्या मनात साशंकता आहे. शासनाने तातडीने या योजनेच्या संदर्भाने समोर येऊन स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. जर ही योजना बंद होणार असेल तर ती का बंद होतेय याबाबतची सत्यस्थिती शासनाने जनतेला सांगायला हवी.

उलट गणेशोत्सवाच्या काळात न दिलेला शिधा निदान या दिवाळीत द्यावा अशी आमची शासनाकडे मागणी असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
पूर्वी सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत सणासुदीच्या काळात सरकारकडून गरीबांना रेशन दुकानातून अत्यल्प दरात साखर, डाळ, रवा, तेल, हरभरा डाळ, मैदा आदी जीवनावश्यक वस्तू मिळायच्या. शंभर रुपयांत एक आनंदाचे पॅकेज मिळायचे. परंतु सध्या रेशन दुकानांत फक्त २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ यांचाच पुरवठा होत आहे. काही ठिकाणी तर एकच ठराविक धान्यच मिळते , पण बाकी सर्व वस्तू गायब आहेत.

सध्या बाज-ारात डाळ, तेल, रवा, साखरेचे दर गगनाला भिडले. परिणामी गरीबांना या वस्तू बाज- ारातून घेणे परवडणारे राहिलेले नाही. पूर्वी शिधा मिळत असल्याने सण साजरे करता येत होते. आता मात्र सणच ओसरून जात आहेत. गरीब मोलमजुरी करून कसेबसे पोट भरतोय, त्यात सणाच्या काळातही आनंद न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. गतवर्षी आनंदाचा शिधा मिळायचा, तेव्हा सण गोड व्हायचे. यंदा अनेक सण गेले तरी काहीच मिळाले नाही. दिवाळीला तरी सरकार काही देईल का? असा सवाल शिधा धारकांनी उपस्थित केला आहे.

गोरगरीब कुटुंबांना सण आनंदात साजरे करता यावेत यासाठी मागील तीन वर्षांपासून सुरू असलेली ‘आनंदाचा शिधा’ ही महत्त्वपूर्ण योजना यंदाच्या दिवाळीतही लाभार्थ्यांना मिळणार नाही. गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीतही हा शिधा न मिळाल्याने, राज्य सरकारने ही योजना अघोषितपणे बंद केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आनंदाचा शिधा’ या योजनेवर आमदार रोहित पवार यांनीसुद्धा त्यांचं मत व्यक्त केले आहे. ‘निवडणुका सरो..मतदार मरो’ या तत्वाने काम करणाऱ्या देवा भाऊ सरकारने आता आनंदाचा शिधा योजनेवर देखील गदा आणली आहे. योजनेला निधी उपलब्ध न करून अप्रत्यक्षपणे योजनाच बंद करण्याचा नवा फॉर्म्युला या सरकारने आणला असून आनंदाचा शिधा योजनेबत देखील तेच होताना दिसत आहे… गणपती नंतर दिवाळीत देखील आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचं समोर येत आहे.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणलेली योजना म्हणून ही योजना बंद केली जातेय का हा संशोधनाचा विषय असला तरी २० लाखांची गादी–सोफा वापरणारे अलिशान सरकार आनंदाचा शिधा योजनेसाठी निधी देऊ शकत नसेल तर मग या सरकारला काय म्हणावे? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

मराठवाडा आणि सोलापूरसारख्या भागांमध्ये नुकत्याच उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. घरातील धान्याची नासाडी झाली आहे. अशावेळी दिवाळीसाठी ‘आनंदाचा शिधा’ पुरवला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दिवाळी तोंडावर आली तरी शासनस्तरावर कोणतीही हालचाल नसल्याने अतिवृष्टी बाधितांनाही या योजनेचा तात्काळ दिलासा मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
राज्य सरकारने ‘आनंदाचा शिधा’ योजना बंद करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, यावर्षी गणेशोत्सव आणि दिवाळीसाठी निधी न देऊन योजना अघोषितपणे बंद करण्याची तजवीज करून ठेवली असल्याचे बोलले जात आहे.

Previous Post

वन्यजीव संरक्षणासाठी जनजागृती;पेरमिली वनपरिक्षेत्रात वन्यजीव सप्ताहाचे आयोजन

Next Post

रक्षकच निघाला भक्षक;वनरक्षकाचा अवैध सागवान तस्करीत सहभाग उघड

admin

admin

Next Post
रक्षकच निघाला भक्षक;वनरक्षकाचा अवैध सागवान तस्करीत सहभाग उघड

रक्षकच निघाला भक्षक;वनरक्षकाचा अवैध सागवान तस्करीत सहभाग उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1