मोहोळ :(प्रतिनिधी नानासाहेब ननवरे) वीज वितरण महामंडळ यांनी सक्तीचे वीज बील वसुली थांबवावी म्हणून भैय्यासाहेब देशमुख यांनी दि ०८ मार्च रोजी मोहोळ येथील वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.परतुं मोहोळ वीज वितरण सबस्टेशन अभियंता पवार साहेब यांना दुसर्या दिवशी ही निवेदन स्वीकारत नाही म्हणून शेतकरी व भैय्यासाहेब देशमुख यांनी अभियंता पवार साहेब यांना कार्यालय ला कुलुप लावुन आत कोंडले.म्हणुन शासकीय कामात अडथळा आणला म्हणून त्यांच्यावरती व शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत ते तात्काळ मागे घ्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकरी च्या वतीने देण्यात आला आहे. सर्व पक्षीय नेते मंडळी कडुन देण्यात आला.
जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख व शेतकऱ्या वरती गुन्हे दाखल केलेले मागे घ्यावेत म्हणून कुरुल ,कामती ,पाटकुल, खंडाळी गावामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे..
मोहोळ वितरण महा मंडळ कार्यालय समोर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे भैय्यासाहेब देशमुख व शेतकरी यांनी पवार साहेब यांना ऑफिस लोक कुलूप लावल्यामुळे त्यांच्यावर ती गुन्हा दाखल केलेला आहे..
शेतकरी बांधवांच्या भावना व्यक्त व्यक्त करत असताना जर आंदोलनाची दखल घेतली असती तर भैय्यासाहेबांनी व शेतकरी बांधवांनी तुमच्या ऑफिसला कुलूप लावलं नसतं अशी प्रतिक्रिया शेतकरी बांधवांच्या तोंडून व्यक्त होत आहे..
शेतकरी बांधवांची लढणारा भैय्यासाहेब देशमुख यांना जाणुन बुजुन गुन्हे दाखल केलेले आहे त म्हणून प्रशासनाच्या निषेध म्हणून मोहोळ तालुक्यातील गावांमध्ये शेतकरी बांधवांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.त्यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, भिमाचे संचालक बापूसाहेब जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख बापुसाहेब भोसले,उपाध्यक्ष विनोद आंबरे, जिल्हा उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत निकम, मनोज जाधव, धनाजी जाधव, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लांडे, सुभाष माळी, राजेंद्र लांडे, दत्ता चव्हाण,सोनु पवार, अमोल जाधव, प्रशांत पाटील यांच्या वतीने कामती पोलिस स्टेशन देवकते साहेब यांना कुरुल मध्ये निवेदन स्वीकारले.कुरुल पत्रकार बंधु मामा कुलकर्णी, सुहास घोडके, सुभाष शिंदे, कुमार बाळसराफ उपस्थित होते.