कोल्हापूर वृतांत : सततची नापिकी आणि बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून परभणीच्या सचिन बालाजी जाधव या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. तर पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या गर्भवती पत्नीनेही विष घेत आत्महत्या केली. याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला जोरदार लक्ष्य केले आहे.
दीड लाखासाठी शेतकरी नवरा-बायकोची आत्महत्या
एकीकडे परभणी जिल्ह्यातील सचिन जाधव हा शेतकरी दीड लाख रुपये कर्ज झाले म्हणून स्वतः आत्महत्या केली. ते पाहून त्याच्या पत्नीनेही सांगकळी आत्महत्या केली. त्याची पत्नी सात महिन्याची गर्भवती होती म्हणूनच सरकारने दीड लाखाच्या कर्जासाठी तीन निष्पाप जीवांचा बळी घेतला.
सचिन जाधव याने माळसोन्ना शिवारातील शेतीवर स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज काढले होते. बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून तणावाखाली येऊन त्याने फवारणीचे विषारी औषध प्राशन केले. पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याची पत्नी ज्योती हिने देखील विष घेतले.













