*आदर्श विद्यालयाचे माजी विद्यार्थी रमले जुन्या आठवणीत* …
पाटस प्रतिनिधी – योगेश राऊत
पाटस : दौंड तालुक्यातील कानगाव येथील आदर्श विद्यालयाचे माजी विद्यार्थी रमले २२ वर्षानंतर जुन्या आठवणीत
शेरू ऍग्रो टुरिझम यवत येथे १६ मार्च २०२५ रोजी, सन -२००३ च्या दहावीच्या बॅचचे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . त्या निमित्ताने तब्बल २२ वर्षांनी वर्ग मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र आल्याने सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता . महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि विद्देची देवता सरस्वती प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली . चहापान आणि अल्पोपहार आयोजन देखील करण्यात आले होते .
यावेळी जुन्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेबद्दलच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला . माजी विद्यार्थ्यांकडून शाळेविषयी कृतज्ञता म्हणून सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांना शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमासाठी उपस्थित शिक्षक आदरणीय कुरुमकर सर,एस.एस.गवळी सर, खडके सर आणि टी.ए गवळी सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश जगताप आणि संतोष भाऊ राजपुरे यांनी केले या कार्यक्रमासाठी रोहिणी चौधरी ,विद्या गायकवाड ,नीता फडके, माधुरी लोणकर ,
अशोक जगताप,दत्ता चौघुले ,भाऊसाहेब कोऱ्हाळे पाटील,संतोष भाऊ राजपुरे ,रमेश जगताप ,भानुदास काळे या सर्व माजी विदयार्थ्यांनी परिश्रम घेतले.
अश्या पद्धतीने सन -२००३ च्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम अगदी उत्साहात आणि खेळीमेळी च्या वातावरणात पार पडला …..
शेवटी
दरवर्षी पुन्हा भेटू असे आश्वासन सर्वानी एकमेकांना दिले आणि निरोप घेतला .













