वंचित बहुजन आघाडी व तक्षशिला बहुउद्देशिय सामाजिक संस्था सणसवाडी यांचे वतीने महाबोधी महाविहार मुक्ती साठी निवेदन
विश्वनाथ घोडके प्रतिनिधी
सम्राट अशोक ह्यांनी इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले.तथागत बुद्धांना ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे.त्यामुळे देशातील नव्हे,तर जगभरातील बौद्ध अनुयायी भिक्खू आणि पर्यटक या स्थळाला भेट देतात,मात्र या महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही.महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे,महाबोधी महाविहार (बोधगया, बिहार) हे पवित्र बौद्ध धर्मस्थळ असून,बोधगया महाविहार कायदा १९४९ चा अन्यायकारक कायदा रद्द करावा.बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे.जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष विकास निधी आणि सुविधा तात्काळ देण्यात याव्यात यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पीआय दिपरतन गायकवाड साहेब यांचे मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना वंचित बहुजन आघाडी व तक्षशिला बहुउद्देशिय सामाजिक संस्था सणसवाडी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा संघटक विश्वनाथ घोडके,संस्थेचे सचिव मालोजी भेदेकर,संस्थेचे उपाध्यक्ष मोतीराम निकुंभ,संस्थेचे सहसचिव हरीश गुडदे,सह खजिनदार दिलीप जाधव,संस्थेचे सल्लागार विष्णू इंगळे,अरुण गायकवाड,सदस्य राहुल रायभोळे,गौतम मोरे,राहुल वाघमारे,सुधाकर लोखंडे,आप्पा कांबळे,विपुल घोडके,कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ संघाच्या महिला शिरूर तालुकाध्यक्षा निर्मलाताई माने,श्रुतिका सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा रेखा गायकवाड,वंचितच्या निकिता बानाटे,सामाजिक कार्यकर्ते युवराज झेंडे,वंचितचे सणसवाडी शाखा अध्यक्ष तुकाराम मोरे,वंचित बहुजन युवा आघाडीचे नरेश पटेकर,आकाश राऊत,सचिन साळवे,अजय कांबळे,रवींद्र साळवे यांचेसह अनेक समाज बांधव उपस्थित होते.













