शिरूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; 16 वर्षीय मुलाला अटक
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे
शिरूर (पुणे): शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 16 वर्षीय मुलाला रांजणगाव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विधी संघर्ष बालक असून, त्याला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
फिर्यादी (वय 39 वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची 14 वर्षीय मुलगी आणि आरोपी यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर आरोपीने तिला कारेगाव येथील त्याच्या घरी नेऊन दोन वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच, याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
गुन्ह्याची नोंद
याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम 351(2) (3), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 कलम 4, 8, 12, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) सुधारणा कायदा 2015 कलम 3(1) (w) (i) (ii), 3(2)(v) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास सुरू
या प्रकरणाचा तपास शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलिसांचे आवाहन
अशा घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन रांजणगाव पोलिसांनी केले आहे.













