इनामगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी शहाजी रामभाऊ शिंदे व व्हाईस चेअरमनपदी शीतल संजय तोरडमल यांची बिनविरोध निवड
अल्लाउद्दीन अलवी प्रतिनिधी
इनामगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील इनामगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी शहाजी रामभाऊ शिंदे, तर व्हा चेअरमनपदी शितल संजय तोरडमल यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल बाभुळसर बु.च्या आदर्श सरपंच दिपालीताई महेंद्र नागवडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मा.श्रीनिवास तात्या घाडगे उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ,ग्रामपंचायत सदस्य महेश घाडगे, ग्रामपंचायत सदस्य सतीश नलगे, महेंद्र नागवडे मा. उपाध्यक्ष जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती ,भाऊसाहेब थोरात मा. चेअरमन बाभुळसर बु वि का सोसायटी,सोमनाथ नागवडे ग्रामपंचायत सदस्य, संजय तोरडमल, सर्जेराव भालेराव आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते .यावेळी बोलताना सरपंच दिपालीताई नागवडे यांनी चेअरमन ,व्हा चेअरमन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .तसेच यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार महेश घाडगे यांनी मानले.













