सुमित हेपट, मारेगाव: निसर्गरम्य नवरगाव हे आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशामुळे प्रसिद्ध आहे. येथे असलेले हेमांडपंथी नृसिंह मंदिर आणि शिव मंदिर यामुळे गावाची धार्मिक ओळख आहे. निर्गुडा नदीच्या किनारी वसलेले हे गाव एकेकाळी भरभराटलेली बाजारपेठ म्हणून ओळखले जात होते.
दरवर्षी महाशिवरात्रीनंतर सहाव्या दिवशी येथे तुळशी वृंदावन यात्रेचे आयोजन केले जाते. मागील तीन वर्षांपासून कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे मित्र परिवाराने यात्रेच्या महत्त्वात भर घालत शंकरपटाचे आयोजन सुरू केले आहे. मागील दोन वर्षांमध्ये लाखोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती.
यावर्षी ता. ५ ते ७ मार्च दरम्यान दोन गटात स्पर्धा घेण्यात येणार आहे.
➡️ उद्घाटन: अरविंद ठाकरे (सरपंच, कुंभा)
➡️ अध्यक्ष: संजय खाडे
➡️ स्वागताध्यक्ष: माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार
मराठवाडा, मध्य प्रदेश आणि विदर्भातून नामवंत बैलजोड्या आणि गाड्या येथे दाखल होत आहेत.
तुळशी वृंदावन देवस्थान कमेटी, ग्रामपंचायत नवरगाव, करणवाडी, डोर्ली, हिवरी, टाकरखेडा यांच्या सहकार्याने हा शंकरपट रंगणार आहे.
कुंभ्याचा ठाकरे बाणा मैदानात पाहण्यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता आहे.













