दुबई : किंग विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये अविस्मरणीय कामगिरी केली. कारण विराट कोहलीने यावेळी एक अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड तर आपल्या नावावर केलाच, पण त्याचबरोबर एक इतिहासही रचला.
आतापर्यंत क्रिकेट विश्वात अशी काामगिरी एकाही खेळाडूला करता आलेली नाही.
विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या सामन्यातही भारताच्या मदतीला धावून आला. यापूर्वी विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले होते आणि संघाच्या विजायवर शिक्कामोर्तब केले होते. वनडे क्रिकेटमधल्या किंग असलेल्या विराट कोहलीने ऑस्ट्रेलियालाही पाणी पाजले. शुभमन गिल बाद झाल्यावर विराट कोहली फलंदाजीला आला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची चांगली जोडी जमेल, असे चाहत्यांना वाटत होते. पण रोहित शर्मा २८ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर विराट कोहलीच्या खांद्यावर संघाच्या विजयाची जबाबदारी आली.
विराट कोहलीने त्याचबरोबर धावांचा पाठलाग करताना आठ हजार धावांचा महत्वपूर्ण टप्पाही आता पूर्ण केला आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या नावावर आता ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली आहे.
चेज मास्टर या नावाने विराट कोहली क्रिकेट विश्वात ओळखला जातो, ही त्याची ओळख पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात अधोरेखित झाल्याचे पाहायला मिळाले













