वरोरा | प्रतिनिधी
युवासेनेच्या कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या आशीर्वादाने युवासेना वरोरा तालुका व जय श्री राम क्रिकेट क्लब, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने युवासेना चषक २०२५ स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता वरोरा येथील कॉटन मार्केट ग्राउंड, नवीन नगर परिषद समोर हा क्रिकेटचा महासोहळा रंगणार आहे.
या प्रतिष्ठित स्पर्धेचे उद्घाटन आमदार नरेंद्र भोंडेकर, तर अध्यक्षस्थान विधान परिषद आमदार कृपाल तुमाणे भूषवणार आहेत. तसेच युवासेना महा. मुख्य सचिव राहुल लोडे, युवासेना सचिव किरण साळी, विदर्भ संघटक किरण पांड विभागीय सचिव शुभम नवले,हर्षल शिंदे कार्यकारणी सदस्य आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेतील बक्षिसे आणि पुरस्कार
क्रिकेटप्रेमींसाठी ही स्पर्धा मोठ्या उत्साहाची असणार असून विजेत्या संघासाठी रु. 1,00,001/- चे प्रथम पारितोषिक असून त्याचे प्रायोजक मंगेश काशिकर, जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना, नागपूर आहेत.
द्वितीय पारितोषिक – रु. 51,001/-
तृतीय पारितोषिक – रु. 31,001/-
मालिकावीर – रु. 5,001/- (रवि काळे)
उत्कृष्ट फलंदाज – रु. 5,001/- (ओम जाधव)
उत्कृष्ट गोलंदाज – रु. 5,001/- (आशिफ शेख)
स्पर्धेसाठी महाशिवरात्री शोभायात्रा समिती, वरोरा, नवरंग गणेश मंडळ, आझाद हिंद गणेश मंडळ, मोरया गणेश मंडळ, सुखकर्ता गणेश मंडळ, हनुमान मंदिर देवस्थान गणेश मंडळ, जय अंबे शारदा उत्सव मंडळ, नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळ, शेतकरी गणेश मंडळ, मोहबाळा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
स्पर्धेचे आयोजन युवासेना तालुका प्रमुख प्रणव पारेलवार व युवासेना तालुका सचिव रितीक जाधव,अमित घोडमारे, अक्षय रासेकर, सौरभ खापणे यांनी केले असून नियोजनात आलेख रठ्ठे (युवा सैनिक) यांची महत्त्वाची भूमिका आहे.
युवासेनेच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या भव्य स्पर्धेसाठी क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.













