प्रतिनिधी / भंडारा
भंडारा दि. 23. – भीम आर्मी भारत एकता मिशनचे संयोजक ॲड. चंद्रशेखर आझाद यांच्या प्रेरणेतून महेंद्र बन्सोड यांची भंडारा तालुक्यातील खमारी बुट्टी शाखेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने सामाजिक एकतेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बन्सोड यांचे नेतृत्व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देईल आणि भंडारा तालुक्यातील सामाजिक न्यायाच्या योजनेत सकारात्मक बदल घडवेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. ही नियुक्ती भीम आर्मीच्या उद्दिष्टांनुसार कार्याला एक नवीन दिशा देईल.1












