• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

बसमधील प्रवाशांच्या सतर्कतेमुळे वाचले संगमनेर येथील सह प्रवाशाचे प्राण

निमगावजाळी आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश

admin by admin
January 24, 2025
in ताज्या बातम्या, नाशिक, पुणे, प्रशासन
Reading Time: 1 min read
A A
0
Spread the Information

RelatedPosts

भरधाव अज्ञात ट्रकची दुचाकी व टाटा मॅजिकला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चालक फरार

प्राण्याचा मृतदेह समजून दुर्लक्ष केले, _पण जवळ जाऊन पाहताच पायाखालची जमीन सरकली, कर्जत-खोपोली हायवेवर काय घडलं?_

मानवतेला काळिमा! झुकलेली कंबर, कोरडे ओठ अन् थरथरणारे हात.; 28 वर्षीय तरुणाकडून 80 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार_

राहुरी प्रतिनिधी :(शहाजी दिघे )

राहुरी  : सांगली जिल्ह्यातील कवठे – महांकाळ येथुन नाशिककडे जात असलेले महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून संगमनेर येथील रोहिदास सावित्रा धात्रक (वय – ६५) हे प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांना ह्रदय विकाराचा त्रास होऊ लागला. त्यामुळे सह प्रवासी, बस चालक, वाहकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे‌.याबाबत मिळालेली माहिती अशी की, संगमनेर येथील रहिवासी असलेले रोहिदास धात्रक हे नगर येथुन संगमनेर येथे जाण्यासाठी महामंडळाच्या बसमध्ये बसले होते. ही बस चिचंपुर फाट्याजवळ आली असता धात्रक यांना ह्रदयात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि ते बेशुद्ध झाले. ही बाब बसमधील इतर प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे धाव घेऊन बसचे वाहक व चालक यांना यांची माहिती दिली. त्याचंवेळी एका दुकानदाराने त्यांना निमगावजाळी येथील सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. ही घटना गुरुवार दि. २३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली.घटनेचे गांभीर्य ओळखून बस चालकाने प्रसंगावधान राखत बस थेट प्राथमिक आरोग्य केंद्र निमगावजाळी येथे नेली. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तय्यब तांबोळी यांनी रोहिदास धात्रक यांच्यावर तातडीचे उपचार सुरू केले. रुग्णालयात ईसीजीची सुविधा उपलब्ध असल्यामुळे रुग्णाचा ईसीजी काढून योग्य ते उपचार केल्यामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यात यश आले. यावेळी आरोग्य निरीक्षक राहुल बागुल, आरोग्य सेवक प्रमोद साठे, आरोग्य सेविका अंजुम पठाण, सविता शिरसाठ यांनी विशेष परिश्रम घेतले.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच धात्रक यांच्या नातेवाईकानी निमगावजाळी आरोग्य केंद्राचे डॉक्टर, कर्मचारी, बसचे चालक, वाहक आणि प्रवाशाचे आभार मानले आहेत. तर परीसरातुन देखील सर्वांचे कौतुक होत आहे.बस थेट रुग्णालयाच्या प्रांगणात आल्यामुळे माझ्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी तात्काळ तिकडे धाव घेतली. बसमधील बेशुद्ध व्यक्तीला प्रवाशाच्या सहकार्याने उपचारासाठी आतमध्ये नेले. उपचारादरम्यान तब्बल तासभर बस उभी असूनही कोणत्याही प्रवाशाने घाई अथवा गोंधळ न करता त्या व्यक्तीवर प्राथमिक उपचार करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले. त्यामुळेचं त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र निमगावजाळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तय्यब तांबोळी यांनी बोलताना दिली.

Previous Post

महेंद्र बन्सोड यांची भीम आर्मीमध्ये भंडारा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

Next Post

सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

admin

admin

Next Post
सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1