
पारनेर : नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोत्रे खुर्द येथील विद्यार्थी विराज सुभाष सासवडे यांनी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला .मागील आठवड्यामध्ये धोत्रे खुर्द येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अमेरिका येथील अ टच ऑफ लव्ह फाउंडेशनचे संस्थापक व्हेन गेलर त्याचप्रमाणे व्हिक्टोरिया गॅलर यांनी या शाळेला भेट दिली .यावेळेस टच ऑफ लव फाउंडेशनचे भारतीय समन्वयक डॉक्टर संजय बांडे उपस्थित होते .यावेळी झालेल्या चर्चेमध्ये डॉक्टर संजय बांडेयांनी विराज च्या हस्ताक्षराबद्दल संस्थेचे संस्थापक वेन गॅलर यांना या विषयी माहिती दिली .
डॉ .बांडे संजय यांनी यावेळेस विराजचेसर्व हस्तलिखित अमेरिका स्थित वेन गॅलरी आणि व्हिक्टोरिया गॅलर यांना दाखविले .हे सर्व बघितल्यानंतर व्हिक्टोरिया यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की भारतीय खेड्यांमधील अतिशय दुर्गम अशा भागातील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी इतके सुंदर हस्ताक्षर काढू शकतो यावर विश्वास बसत नाही .त्यांच्या सेवाभावी संस्थेच्या वतीनेशाळेसाठी नेहमी नवनवीन उपक्रम राबवले जातात .ज्यामध्ये मुलांचा वैयक्तिक विकास व्यक्तिमत्व विकास सामाजिक विकास यासाठी योगदान देण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो .खेडेगावातील ही प्राथमिक शाळा शिक्षक सचिन ठाणगे आणि चारुशीला रायकर यांच्या अतिशय प्रयत्नशील उपक्रमामुळे नेहमीच अग्रस्थानी आहेत याची जाणीव संस्थापक वेन गॅलर यांनी यावेळेस बोलून दाखवली .
विराजचे शिक्षक सचिन ठाणगे सर यांनी आजपर्यंत शाळेमध्ये अनेक उपक्रम राबविले आहेत .त्याची नोंद राज्य सरकार त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्रशासन यांनी नोंदवलेली आहे .मागील वर्षांमध्ये मोडी लिपी जी आज कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये नाही .परंतु सचिन ठाणगे सरांच्या माध्यमातूनजिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोत्रे येथील विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम सचिन ठाणगे सर यांनी केले आहे .ज्याची नोंद नुकतेच नगरचे जिल्हाधिकारी साहेब यांनी घेतलेली आहे .याबद्दल जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांचे कौतुक देखील केलेले आहे .
सुभाष सासवडे
(पालक)












