सोलापूर प्रतिनिधी:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळेवस्तीस ठाणे एसटी महामंडळाचे विभागीय अधिकारी धनंजय शिंदे आणि बडोदा येथील इंजिनीयर सत्यशोधन पाटील यांनी शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शास्त्रज्ञांची फोटो दाखवून त्यांच्या कार्याची माहिती सत्यशोधन पाटील यांनी दिली.
तसेच, शिंदे यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजीत काही प्रश्न विचारले, ज्याला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. शाळेतील विद्यार्थी राजवीर याचा वाढदिवस निमित्त दोघांनी त्याचा सत्कार केला.
यावेळी शिंदे आणि पाटील यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक संतोष पोतदार, विद्यार्थी श्रेयस नाळे, कार्तिक नाळे, अक्षय येळे, तसेच सहशिक्षिका अनुराधा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या प्रगतीला पाहून शिंदे आणि पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
शाळेच्या या भेटीदरम्यान सर्व विद्यार्थ्यांना खाद्यवाटपही करण्यात आले. योगेश चुंबळकर यावेळी उपस्थित होते.













