पुलगाव: नाचनगाव येथील रहिवासी रूपेश अशोकराव चादोरे (वय ३५) याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
आज सकाळी रूपेशच्या मोबाईलची बेल वाजत असताना, घरचे सदस्य खोलीत गेले आणि तेथे रूपेश स्लॅपच्या हूकाला दोरी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.
गेल्या वर्षी रुपेशची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली होती, आणि त्याला एक सहा वर्षांची मुलगी आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र त्याच्या घराजवळ मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी जमली होती.
रूपेश मागे आई, वडील, भाऊ, पत्नी आणि मुलगी यांचा मोठा परिवार आहे. शव ग्रामीण रुग्णालय, पुलगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पुढील तपास पुलगाव पोलिस करत आहेत.













