
अहिल्यानगर: जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील साडेतीन शक्तीपीठ एकत्र असलेल्या एकमेव अशा श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपुर येथे भाविक भक्तांच्या स्वागतासाठी बांधण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा स्वागत कमानी चे काम पूर्ण झाले आनंदाची गोष्ट म्हणजे पुढील पौष महिन्यात होऊ घातलेल्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर या स्वागत कामानीचे काम पूर्ण झाल्याबद्दल गावातील नागरिकांमध्ये एक वेगळा उत्साह दिसून येत आहे.

यामुळे पौराणिक असलेल्या श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपुर च्या वैभवात आणखी भर पडल्याचे बोलले जात आहे. अतिशय सुंदर भव्य दिव्य कलाकृती असलेल्या स्वागत कमानी कडे बघून कोल्हारकरांची मान अभिमानाने उंच झाली असल्याचे दिसून येत आहे. कमानीच्या मध्यभागी असलेली आकर्षक गणेशाची मूर्ती तसेच कमानीच्या दोन्ही बाजूस असलेल्या सुंदर गज(हत्ती )मूर्ती सर्व लहान थोरांचे लक्ष वेधून घेत असल्याचे चित्र दिसुन येत आहे.श्री क्षेत्र शिर्डी पासून २५ कि.मी अंतर असलेल्या या गावात शिर्डीहून शनिशिंगणापूर कडे जाणारे राज्यातील तसेच पर राज्यातील भाविकभक्त सर्वांच्या नवसाला पावणाऱ्या श्री भगवती मातेच्या दर्शनासाठी आवर्जून येथे थांबतात.












