
लोणी : लोणी येथील म्हसोबा यात्रेतून सोन्याच्या दागिने चोरट्यांनी पळविल्याची घटना उघडकीस आल्या आहे. या घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील लोणी येथील म्हसोबा यात्रेत घडल्या आहेत . ज्यावेळी चोरी झाल्याची बातमी सगळीकडे व्हायरल झाली, त्यावेळी घटनास्थळी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. ज्या महिलेचे दागिने चोरी झाले त्या महिलेची अवस्था पाहून लोकं इमोशनल झाली होती. याप्रकरणी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकार्यास महिलेने हकीकत सांगितली त्यावेळी पोलीस कर्मचारी यांनी महिलेस तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला व मंदिरात लहान मुले आहेत त्यांचे चेहरे लक्षात येत नाहीत असे सांगितले . विशेष म्हणजे तीन दिवस सलग चोरट्याने डल्ला मारल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे.तरी सदर चोर हे लहान नसून महिला आहेत असे निदर्शनास आले आहे यांचे कारण म्हणजे सध्या गर्दी कमी झालेली असल्याने मंदिरात दर्शनास आलेल्या महिलांची गर्दी म्हसोबा महाराजांच्या मूर्ती समोर असते व चोरट्या महिला या महिलांना हेरून गळ्यातील दागिने कापून घेतात. विशेषत : मंदिरात महिलांची गर्दी जास्त असते यावेळी देखरेख करण्यासाठी महिला कर्मचारी यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे परंतु लोणी पोलीस दिरंगाई करत असल्यामुळे चोरट्यांना रान मोकळे झाले आहे त्यामुळे बंदोबस्त कडक असावा असे वाटते व मंदिर परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे लाऊन यात्रेच्या वेळी सिसिटीव्ही लाईव्ह असावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.तरी यात्रा समितीने पुढील यात्रेवेळी यामध्ये सुधारणा करावी अशी मागणी सोने मोबाईल रोकड चोरी गेलेल्या महिला व पुरुष करत आहेत.











