
शिर्डी : केज तालुक्यातील मस्साजोग येथील मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय मराठा सेवक आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी याकरिता छावा क्रांतिवीर सेना राहाता तालुक्याच्या वतीने, आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा सर्वप्रथम निषेध व्यक्त करून . हि हत्या केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून, मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या चळवळीवर आघात आहे. मराठा समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या व्यक्तीचा आवाज दाबण्याचा हा एक प्रकार आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी आम्ही खालील मागण्या आपल्या मार्फत मा. मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडे सादर करत आहोत.
या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावीअशी मागणी करून .सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी छावा क्रांतिवीर सेना राहाता यांचे वतीने तहलीसदार निवेदन देण्यात आले
यावेळी जिल्हाप्रमुख अविनाश शिंदे युवा तालुकाप्रमुख नितीन अनारसे शिर्डी शहर प्रमुख संदीप गुंजाळ संदीप वाघ अनिल मलदोडे शिवसेना नेते नानक सावंत, शिवसेना उप तालुकाप्रमुख सुभाष उपाध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे सचिन आरणे राहुल वाणी मदन दिवे सर संतोष वाघ वैभव गांगुर्डे व आदी छावाचे मावळे उपस्थित होते.












