चंद्रपूर : मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसने आदीपासूनच पुढाकार घेतला आहे. भाजपा मुस्लिमविरोधी धोरणे आखत असल्याने लोकशाही देशांमध्ये असूनही गळचेपी होताना दिसते. त्यामुळे मुस्लिम समाजाने काँगेस सोबत कायम राहावे, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते घुग्गुस येथे जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष सोहेल रजा यांच्या पुढाकाराने पक्षप्रवेश व पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग सुनिल सिल्का, जिल्हा महासचिव अल्पसंख्याक विभाग रोहित मंडल यांनी या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता. या मेळाव्याला अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल शेख, महाराष्ट्र अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष रमजान अली, रोशन पचारे, सय्यद अनवर, पवन आगदारी, ताजुद्दीन शेख, सुरज कन्नुर, हासीम खान,नसीम यांची उपस्थिती होती.
या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग सुनिल सिल्का, जिल्हा महासचिव अल्पसंख्याक विभाग रोहित मंडल, जिल्हा सचिव अल्पसंख्याक विभाग किरन झुजीपेल्लीवार यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी पास्टर रमेश नातर, सुदीर अरमुर्ला, वेल्सन कोलगुरी, स्टेफन सिद्धाला, रूबेन तकल्ला,देवीदास सिल्का, येसुदर अरमुर्ला, ने महेमानो का स्वागत किया। लड्डू सिल्का, आशीष गुडेटी, आर्यण कोमलावार, निखील मिनमुले, हृदय अड्डुर, उदय अरमुर्ला,विन्सन नातर, सुयोग तांड्रा,रूपसागर तालापेल्ली, सुमित मंडल, सनी मंडल, प्रशांत तालापेल्ली, प्रशांत अड्डुर,भरत कोन्ड्रा, रितीक लंका, अमण, निखील, सुशील अरमुर्ला, साहील तान्ड्रा, आशिष डीकोडा, दीप टीपले, लकी तकल्ला यासह अन्य शेकडो अल्पसंख्याक समाजातील युवकांनी काँग्रेमध्ये खासदार बाळू धानोरकर यांच्याहस्ते प्रवेश घेतला.